Pune News : एकनाथ खडसे कुठेही जाणार नाहीत, सगळ्याचा हिरमोड होणार – चंद्रकांत पाटील

एमपीसी न्यूज – भाजपचं नुकसान होईल असं एकनाथ खडसे वागणार नाहीत. ते प्रदेश कार्यकारणीच्या बैठकीलाही उपस्थित होते. ते नाराज असतील त्यांची नाराजी दुर करू, ते पुन्हा सक्रिय होतील. ते कुठेही जाणार नाहीत, सगळ्याचा हिरमोड होणार असे म्हणत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी एकनाथ खडसे यांच्या पक्ष सोडण्याचा वृत्त खोडून काढलं. पुण्यात आयोजित एका कार्यक्रमात ते पत्रकारांशी बोलत होते.

मुख्यमंत्र्यांनी धावत प्रवास करून उपयोग नाही
मुख्यमंत्र्यांनी धावत प्रवास करून उपयोग नाही. त्यांनी कोरडा प्रवास करू नये. ते मुख्यमंत्री आहेत, निर्णय घेऊ शकतात. त्यांनी तातडीने मदत देण्यासंदर्भात निर्णय घ्यावा. त्यासाठी पंचनामे करण्याची गरज नाही, असे सांगत चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्र्यांच्या दौर्‍यावर टीका केली.

एकत्र सरकार चालवायचं म्हणून शरद पवारांकडून मुख्यमंत्र्यांची भलामण
शरद पवारांना मुख्यमंत्र्यांची वारंवार भलामण करावी लागते. त्यांना प्रोटेक्ट करावं लागतं याचं वाईट वाटतं. हे ते मनापासून करत असतील असं वाटत नाही. सरकार एकत्र चालवायचं म्हणून शरद पवार मुख्यमंत्र्यांची भलामण करताहेत.. बाबा मी या वयात इतका फिरतोय तू ही किमान बाहेर पड, असं पवारांना वाटत असेल.

केंद्राकडून जे मिळेल ते बोनस समजा
प्रत्येक वेळी केंद्र केंद्र करायचं नसतं. आपत्तीच्या वेळी पहिली मदत राज्य सरकारने करायची असते. नंतर केंद्राकडे मदत मागायची असते. राज्य सरकारने आधी मदत घोषित करावी, केंद्रकडून जे मिळेल ते बोनस समजायचं…

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.