Pune News : आजपासून फुलणार एम्प्रेस गार्डन ; दोन वर्षांनंतर भरणार पुष्पप्रदर्शन

एमपीसी न्यूज- पुण्यातील एम्प्रेस गार्डनमध्ये आज पासून पुष्पप्रदर्शनाला सुरूवात (Pune News) होणार आहे. दर वर्षी आयोजन करण्यात येणारे हे  पुष्पप्रदर्शन कोरोनामुळे घेण्यात आले नव्हते.दोन वर्षांनंतर पुन्हा पुष्पप्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले .

विविध मान्यवरांच्या उपस्थितीत आज बुधवार दि. 25 जानेवारी 2023 रोजी दुपारी 12.30 वाजता या पुष्पप्रदर्शनाचे उद्घाटन  होणार असून  दुपारी 1 ते रात्री 8 आणि 26, 27, 28 आणि 29 जानेवारी या दिवसांमध्ये सकाळी 9 ते रात्री 8 या वेळेत प्रदर्शन सर्वांसाठी खुले राहील. या वर्षीचे प्रदर्शन संस्थेचे मा. अध्यक्ष स्व. राहुल बजाज यांच्या स्मृतीस अर्पित करण्यात आले आहे.

पुष्पप्रदर्शनाच्या निमित्ताने पुण्यातूनच नव्हे तर अगदी कोल्हापूर, सांगली, नाशिक, आंध्र प्रदेश इ. ठिकाणाहून नर्सरी व्यावसायिक या पुष्पप्रदर्शना मध्ये सहभागी होण्याकरिता येत (Pune News)असतात.या पुष्पप्रदर्शनाचे वैशिष्ठ्य म्हणजे यामध्ये केवळ फुलांचा समावेश न करता निरनिराळ्या प्रकारच्या शोभिवंत झाडांच्या कुंड्या, भाजीपाला, पुष्परचना, बागेच्या प्रतिकृती इ. गोष्टींचा समावेश असतो.

Breaking News : भीमा नदीत झालेल्या सामूहिक आत्महत्येचे उलगडले कारण

पुष्पप्रदर्शनाच्या निमित्ताने दरवर्षी खास मुलांसाठी चित्रकला व हस्ताक्षर लेखन स्पर्धा देखील आयोजित करण्यात येतात.  यंदाच्या वर्षी देखील शालेय विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धा व हस्ताक्षर लेखन स्पर्धा रविवार दि. 22 जाने. 2023रोजी आयोजित करण्यात आलेली आहे.

पुष्पप्रदर्शनामध्ये मुख्य आकर्षण असते ते म्हणजे विविध प्रकारच्या पुष्परचना. यंदाच्या वर्षीदेखील जपानी पध्दतीने साकारलेल्या विविध पुष्परचना तसेच बोन्साय वृक्षांचे विविध प्रकार स्पर्धकांनी साकारलेल्या विविध कलाकृती या पुष्पप्रेमींच्या पसंतीस नक्कीच उतरतील,

अग्री हॉर्टीकल्चरल सोसायटी ऑफ वेस्टर्न इंडिया ही संस्था निसर्ग संवर्धनाचे कार्य करणारी पुण्यातील सर्वात जुनी व अग्रगण्य संस्था आहे. या संस्थेमार्फत निसर्गसंवर्धनाचे अनेक उपक्रम वर्षानुवर्षे राबविले जात आहेत. त्यापैकीच एक उपक्रम म्हणजे एम्प्रेस गार्डन. एम्प्रेस गार्डन ही पुण्यातील एक ऐतिहासिक बाग असून, अग्री हॉर्टीकल्चरल सोसायटी ऑफ वेस्टर्न इंडिया या संस्थेकडे अगदी एम्प्रेस गार्डनच्या निर्मिती पासून व्यवस्थापनाची जबाबदारी आहे आणि आजवर संस्थेने ती समर्थपणे पेललेली आहे. ही जबाबदारी सांभाळत असताना अथवा बागेमध्ये काही उद्देशपर निर्मिती अथवा नूतनीकरणाची कामे करत असताना, बागेच्या मुख्य रचनेमध्ये कुठेही बदल न करता बागेची नैसर्गिकता (Pune News)जाणीवपूर्वक जपलेली आहे.

तसेच बागेला साजेशी कामे आजवर बागेमध्ये केलेली आहेत. यामुळे बाग अजूनच खुलून दिसते. एरवी एम्प्रेस गार्डन प्रसिद्ध आहे ती मनोरंजनाचे, पर्यटनाचे तसेच वनस्पतीशास्त्रीय अभ्यासाचे केंद्र म्हणून हा दृष्टीकोन समोर ठेवून वर्षभर नव-नवीन उपक्रम बागेमध्ये राबविले जातात. यामध्ये अगदी लहानांपासून थोरांचा सहभाग असतो.

संस्थेमार्फत अगदी 100 वर्षापूर्वीपासून जनमानसात निसर्गाबद्दल आपुलकी निर्माण व्हावी या उद्देशाने पुष्पप्रदर्शने भरविली जात होती. मध्ये काही कालावधीचा खंड वगळता संस्थेने आजवर ती परंपरा कायम (Pune News)ठेवलेली आहे.

एरवी केवळ पानांनी, वेलींनी व हिरवाईने नटलेली एम्प्रेस गार्डन पुष्पप्रदर्शनाच्या निमित्ताने फुललेली पाहण्याची संधी पुणेकरांना मिळणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.