Pune News: महाराष्ट्र केसरीसाठी पुणे जिल्ह्यातून पै. महारुद्र काळेल व पै. शिवराज राक्षे यांची निवड

एमपीसी न्यूज: मानाच्या समजल्या जाणाऱ्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेसाठी पुणे जिल्हा निवड चाचणी लोहगावच्या कै. मारूती खेसे ग्राउंडवर नुकतीच पार पडली. यावेळी अनेक रंगतदार लढती पाहायला मिळाल्या. पुण्यातल्या नावाजलेल्या मल्लांनी यावेळी आपल्या मल्लविद्येचे रांगडे प्रदर्शन केले.

महाराष्ट्र केसरी स्पर्धेसाठी माती विभागातून पै. महारुद्र काळेल व गादी विभागासाठी पै. शिवराज राक्षे यांची निवड झाली. या निवडीबरोबरच ‘महाराष्ट्र चॅम्पियन’साठी विवध वजनी गटासाठी पुण्याचा संघ घोषित केला गेला. या निवड चाचणीचा थरार पाहण्यासाठी प्रामुख्याने पुणे आणि परिसरातील अनेक कुस्तीशौकीन व कुस्तीपटू उपस्थित होते.

या महत्वपूर्ण स्पर्धेच्या आयोजनाची जबाबदारी लोहगावचे मा. उपसरपंच नवनाथ मोझे यांनी अगदी सुनियोजितपणे आपल्या शिरावर पेलली. मुख्य मार्गदर्शक उपमहाराष्ट्र केसरी किताबाचे मानकरी पै. संतोष गरुड होते. इतर मार्गदर्शक मान्यवर म्हणून आमदार सुनील टिंगरे तसेच पांडुरंग खेसे, संदीप आप्पा भोंडवे, संभाजी गरूड उपस्थित होते‌. पुण्याचा अंतिम निवड झालेला संघ पुढीलप्रमाणे…

गादी विभाग
57 किलो – पै स्वप्नील शेलार
61 किलो – पै आबा शेंडगे
65 किलो – पै प्रतीक आवारे
70 किलो – पै केतन घारे
74 किलो – पै मयुर लिमन
79 किलो – पै अक्षय कामठे
86 किलो – पै प्रतीक जगताप
92 किलो – पै प्रताप हेगडे
97 किलो – पै रोहित कार्ले
महाराष्ट्र केसरी गट – पै शिवराज राक्षे
माती विभाग
57 किलो – पै आकाश पडवळ
61 किलो – पै सनी केदारी
65 किलो – पै सूरज कोकाटे
70 किलो – पै विपुल आडकर
74 किलो – पै अरुण खेंगले
79 किलो – पै शिवाजी टकले
86 कीलो – पै शंकर माने
92 किलो – पै अंगद बुलबुले
97 किलो – पै रोहित जवळकर
महाराष्ट्र केसरी गट – पै महारुद्र काळेल

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.