Pune News – व्हायोलिन वरील संत रचनांच्या सादरीकरणाला रसिकांचा उदंड प्रतिसाद

एमपीसी न्यूज -‘भारतीय विद्या भवन’ आणि ‘इन्फोसिस फाऊंडेशन’ च्या सांस्कृतिक (Pune News) प्रसार कार्यक्रमांतर्गत ‘जाऊ देवाचिया गावा ‘ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. 19  मार्च 2023 रोजी सायंकाळी 5.30 वाजता ‘भारतीय विद्या भवन’चे सरदार महादेव बळवंत नातू सभागृह,(सेनापती बापट रस्ता) येथे हा कार्यक्रम झाला.
व्हायोलिनवर संतरचनांचे बहारदार सादरीकरण या कार्यक्रमात करण्यात आले. रसिकांनी भरभरून प्रतिसाद देत, गाणाऱ्या व्हायोलिन ने घडवलेला ‘ देवाचिया गावा ‘ चा लडिवाळ प्रवास अनुभवला. या कार्यक्रमातील सर्व संतरचना व्हायोलिनवर अनुप कुलथे यांनी सादर केल्या. कार्यक्रमाची संकल्पना डॉ वंदना बोकील-कुलकर्णी यांची होती. त्यांनीच सर्व प्रासादिक रचनांचे उत्कट शब्दात निरुपण केले.

 

 

 

Talegaon Dabhade News : तळेगाव दाभाडे येथे दिव्यांगानी घेतला मोफत दिव्यांग शिबिराचा लाभ

रोशन चांदगुडे (तबला),प्रणय सकपाळ (पखवाज),चंद्रकांत चित्ते(की- बोर्ड ),धनंजय साळुंके (ताल वाद्य ) यांनी साथसंगत केली. कलादिग्दर्शन कपिल जगताप यांचे होते. मोगरा फुलला(संत ज्ञानेश्वर), तीर्थ विठ्ठल -क्षेत्र विठ्ठल( संत नामदेव ), भेटीलागी जीवा, सुंदर ते ध्यान उभे विटेवरी( संत तुकाराम ), आता कोठे धावे मन(संत तुकाराम), माझे माहेर पंढरी (संत एकनाथ) अशा अनेक प्रासादिक रचना अनुप यांनी बहारदार पणे सादर केल्या. ‘ ‘अवघा रंग एक झाला ‘(संत सोयराबाई) यांच्या रचनेने समारोप झाला.

 

 ‘भारतीय विद्या भवन’चे मानद सचिव प्रा.नंदकुमार काकिर्डे यांनी स्वागत केले. हा कार्यक्रम विनामूल्य होता. ‘भारतीय विद्या भवन’ आणि ‘इन्फोसिस फाऊंडेशन’च्या सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत (Pune News) सादर होणारा हा 154 वा कार्यक्रम होता .

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.