Pune News : लसीचे दोन्ही डोस घेतल्यानंतर देखील 450 नागरिक झाले कोरोनाबाधित

एमपीसी न्यूज – कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस घेतल्यानंतर देखील तब्बल 450 नागरिकांना कोरोना संसर्ग झाल्याची माहिती समोर आली आहे. उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांनी याबाबत माहिती गोळा करण्याचे आदेश दिले आहेत.

पुणे महापालिकेने याबाबत माहिती गोळा करण्यास सुरुवात केली असून, 450 नागरिक लसीचे दोन्ही डोस घेतल्यानंतर देखील पॉझिटिव्ह आले आहेत. लसीचे डोस घेऊन देखील पॉझिटिव्ह आलेल्या नागरिकांची माहिती पालिकेकडून घेण्यात येत असून, कॉन्टॅक्ट ट्रेसिंग केले जात आहे.

दोन्ही डोस घेतल्यानंतर देखील पॉझिटिव्ह आलेल्या लोकांची माहिती देण्याबाबत पुणे पालिकेने खासगी लॅबना आदेश देण्यात आले आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.