Pune News: पार्थ पवार भाजपत येणार असले तरी आम्ही त्यांना घेणार नाही, खासदार बापट यांचे मोठे विधान

Pune News: Even if Parth Pawar comes to BJP, we will not take him, MP Bapat's big statement जय श्री राम फक्त पार्थ नाही म्हणत तर संपूर्ण जग म्हणते, अशी आठवणही त्यांनी करून दिली.

एमपीसी न्यूज – पार्थ पवार भाजपत येणार असले तरी आम्ही त्यांना घेणार नाही, असे मोठे वक्तव्य खासदार गिरीश बापट यांनी केले. दि. 15 ऑगस्टला पुण्यातील एका कार्यक्रमात बापट यांनी हे विधान केले. जय श्री राम फक्त पार्थ नाही म्हणत तर संपूर्ण जग म्हणते, अशी आठवणही त्यांनी करून दिली.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पार्थ पवार यांना फटकरल्यानंतर ते नाराज असल्याची चर्चा प्रसारमाध्यमातून सुरू आहे. कौटुंबिक स्तरावर हा वाद मिटविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

मात्र, पवार कुटुंबात शरद पवार यांचा शब्द अंतिम असल्याचे सांगण्यात येते. त्यातच आता गिरीश बापट यांनी पार्थ पावरसाठी भाजपचे दार बंद केले आहे. तर, मला माझं काम करू द्या, मला कुणाशीही काही काही बोलायचं नाही, अशा शब्दांत प्रतिक्रिया देऊन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पार्थ प्रकरणावर बोलण्यास नकार दिला आहे.

अजित पवार यांनी अद्यापही या प्रकरणावर चुप्पी साधल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. एरवी तडकाफडकी बोलणारे अजित पवार सध्या कमालीचे शांत आहेत. त्यांची ही शांतता वादळ येण्यापूर्वीचे संकेत तर नाही ना, असा प्रश्न सध्या निर्माण झाला आहे.

अभिनेता सुशांत सिंह रजपूत प्रकरणात सीबीआय चौकशीची मागणी पार्थ पवार यांनी केली होती. त्यावर पार्थ पवार हे अपरिपक्व आहे. माझ्या नातवाच्या बोलण्याला कवडीचीही किंमत देत नाही, अशा शब्दांत शरद पवार यांनी कान टोचले होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.