Pune News : प्रभाग रचना बदलली तरी विजय भाजपाचाच – देवेंद्र फडणवीस

एमपीसी न्यूज : आगामी महापालिका निवडणुकीत जरी प्रभाग रचना बदलली तरी भाजपाच विजयी होईल, असा विश्वास विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.

महापालिकेच्या 2017 च्या निवडणुकीत भाजपने सत्तेचा गैरवापर करत प्रभाग रचनेत गौडबंगाल करून निवडणुका जिंकल्या होत्या, असा आरोप उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला होता. त्याला फडणीस यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

पदवीधर आणि शिक्षक मतदार संघाच्या प्रचारासाठी फडणवीस पुण्यात आले होते. यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना फडणवीसबोलत होते.

महापालिकेच्या निवडणुकांमध्ये भाजपने सत्तेचा गैरवापर वापर करून प्रभाग रचना केली. त्यामुळे भाजपाला महापालिका निवडणुका जिंकता आल्या, असा आरोप उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यात केला होता. राज्यात विकास आघाडीची सत्ता आहे त्यामुळे आता आम्ही पाहू, असा इशारा पवार यांनी भाजपला दिला आहे.

याविषयी फडणवीस पुढे म्हणाले, महापालिका निवडणुकांमध्ये प्रभाग रचना करत असताना सर्वसमावेशक प्रभाग रचना करण्यात आली होती. यामध्ये कोणत्याही विद्यमान नगरसेवकावर अन्याय होणार नाही; अथवा आरक्षणामुळे नुकसान होणार नाही, याचा विचार करण्यात आला होता.

एकंदर प्रभाग रचना महापालिकेच्या कामकाजाच्या दृष्टीने सोयीची होती. राज्यातील महा विकास आघाडी सरकारने प्रभाग रचना बदलली तरी याचा कोणताही फायदा त्यांना होणार नाही. महापालिकेच्या निवडणुका आम्ही जिंकू, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.