Pune News : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वांनी आपल्या कुटुंबाची काळजी घ्यावी : मनीषा कदम

एमपीसी न्यूज – पुणे शहरात कोरोनाचे संकट वाढतेच आहे. त्यामुळे सर्वांनीच आपल्या कुटुंबाची काळजी घ्यावी, असे आवाहन कोंढवा – येवलेवाडी प्रभाग समितीच्या अध्यक्षा मनीषा कदम यांनी केले आहे. 

 राज्य शासनाने सुरू केलेल्या “माझे कुटुंब माझी जबाबदारी” या अभियाांतर्गत  15 सप्टेंबर पासून राज्यातील महानगरपालिका लोकप्रतिनिधींच्या सहकार्यातून शासकीय यंत्रणा प्रत्येक कुटुंबापर्यंत पोहोचणार आहे. या मोहिमेत शासकीय कर्मचारी, महसूल, आरोग्य सेवक पथक प्रभागातील प्रत्येक कुटुंबाच्या घरी जाऊन कुटुंबातील प्रत्येकाची कोरोना संदर्भात आरोग्य तपासणी करणार आहेत.

या अभियानाचा शुभारंभ आज आला. यावेळी माजी महापौर दत्तात्रय धनकवडे, नगरसेविका राणी भोसले, महानगरपालिका सहाय्यक आयुक्त तानाजी नरळे, वैदयकीय अधिकारी अमोल साळुंखे, वरिष्ठ आरोग्य निरीक्षक मंगलदास  माने,  उप आरोग्य निरीक्षक ए. पी. मंद्रुपकर  उपस्थित होते.

ही मोहीम दि.15 सप्टेंबर ते 25 ऑक्टोबर अशी राबविण्यात येणार आहे. कोविडवर  नियंत्रण मिळविण्यासाठी  व मृत्यू दर कमी करण्यासाठी “माझे कुटुंब माझी जबाबदारी” याअंतर्गत ‘कोविड मुक्त पुणे’ अशी ही मोहीम राबविण्यात येणार आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव व अनलॉकमध्ये नागरिकांनी कामानिमित्त बाहेर पडताना सोशल डिस्टन्स, मास्क आणि सॅनिटायजरचा वापर करावा, असेही मनीषा कदम यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.