Pune News : भाजप कार्यकर्त्यांकडून सामान्य नागरिकांना अपेक्षित कार्य व्हावे : महापौर

0

एमपीसी न्यूज – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा सप्ताहात विविधांगी कार्यक्रमाचे आयोजन अभिप्रेत असून या माध्यमातून सामान्य नागरिकांना अपेक्षित कार्य भाजप कार्यकर्ते करत आहेत. हीच नरेंद्र मोदी यांना सर्वोत्तम शुभेच्छा आहे, असे प्रतिपादन महापौर मुरलीधर मोहोळ यांनी केले.

नगरसेविका मंजुश्री खर्डेकर यांनी कायमस्वरुपी सेवा सुविधा केंद्र सुरु केले. याद्वारे नागरिकांना विविध दाखले काढणे सोपे होणार आहे.

सेवा सप्ताह साजरा करत असताना स्वच्छता अभियान, प्लाझ्मा दान, गरजूंना मदत असे विविध उपक्रम राबवत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्त एखादे कायमस्वरूपी सुविधा केंद्र उभारले जावे, असा माझा प्रयत्न होता आणि त्यास अनुसरूनच आज या सुविधा सेवा केंद्राचा प्रारंभ होत असल्याचे नगरसेविका  खर्डेकर म्हणाल्या.

यावेळी नगरसेवक जयंत भावे, भाजप कोथरूड मंडल अध्यक्ष पुनीत जोशी, शहर चिटणीस प्रशांत हरसुले, कोथरूड महिला मोर्चा अध्यक्ष हर्षदा फरांदे, मंडल उपाध्यक्ष राज तांबोळी, प्रभाग १३ चे अध्यक्ष राजेंद्र येडे, कुलदीप सावळेकर, केतकी कुलकर्णी, जयश्री तलेसरा, संगीता आदवडे, सुवर्णा काकडे, ॲड. प्राची बगाटे, माणिक दीक्षित, अपर्णा लोणारे, सुलभा जगताप, रुपाली मगर, जागृती कणेकर, कल्याणी खर्डेकर, बाळासाहेब धनवे, पुष्कर चौबळ, श्रीनिवास घैसास, हितेश राजपूत, शिवाजी पठारे, प्रफुल्ल सुभेदार, जनार्दन क्षीरसागर, निशीकांत भोमे, प्रतीक खर्डेकर, दत्ता मरळ उपस्थित होते.

सूत्रसंचालन संदीप खर्डेकर यांनी केले. राजेंद्र येडे यांनी आभार मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.