Pune News : अबब! नगरसेवकांच्या आरोग्यावर तब्बल साडेपाच कोटींचा खर्च

एमपीसी न्यूज – नगरसेवक आणि त्यांच्या कुटुंबियांच्या आराेग्यावर गेल्या दाेन आर्थिक वर्षात साडेपाच काेटीहून अधिक रुपये खर्ची पडले आहे. विशेष म्हणजे काेराेना कालावधीत हा खर्च वाढला आहे. यामध्ये आमदार पदावर असलेल्या नगरसेवकांकडून माेठ्या प्रमाणावर वैद्यकीय कारणासाठी पैसा खर्ची पडला आहे.

गाेंधळेनगर येथील नागरीक तानाजी घाेलप यांनी माहीती अधिकारात २०२० – २१ आणि २०२१ – २२ या आर्थिक वर्षात महापालिकेचे नगरसेवक आणि माजी नगरसेवकांकरीता राबविण्यात येणाऱ्या वैद्यकीय सहाय्य याेजनेतील खर्चाची माहिती मिळविली आहे. या माहीतीनुसार नगरसेवकांच्या आराेग्यावर लाखाे रुपये खर्ची पडल्याचे स्पष्ट हाेत आहे. विशेष म्हणजे आमदार म्हणून राज्य सरकारच्या आराेग्य विभागाकडून मिळणाऱ्या सवलतीप्रमाणेच काही नगरसेवकांनी महापािलकेच्या वैद्यकीय सहाय्य याेजनेचा लाभ घेतला आहे. तसेच काही नगरसेवकांनी सलग दाेन्ही वर्षांत याेजनेचा लाभ घेण्यात कमतरता दाखविली नाही. विशेष म्हणजे महापालिकेच्या विविध समितीचे पदाधिकारी आणि स्थायी समितीसारख्या समितीत सदस्य म्हणून काम करणाऱ्यांचा यात समावेश आहे. तर अनेक नगरसेवकांचा वैद्यकीय खर्च हा काही हजारातच झालेला आकडेवारीतून दिसत आहे.

 

वैद्यकीय  सहाय्य याेजनेसाठी २०२० – २१ या आर्थिक वर्षाकरीता २ काेटी ७० लाख रुपयांची तरतुद केली गेली हाेती. ही तरतुद खर्ची पडल्यानंतर १ काेटी ६७ लाख रुपये वर्गीकरणातून उपलब्ध करून दिले गेले. महापािलकेच्या आराेग्य विभागाकडे जमा झालेल्या ४१९ बिलांपाेटी ४ काेटी ३६ लाख ८४ हजार रुपये खर्ची पडले. यावर्षी सुमारे ३५ बिलांची रक्कम एक लाख रुपयाहून अधिक आहे. आजारपणामुळे मरण पावलेल्या दाेन नगरसेवकांच्या उपचाराकरीताही महापािलकेने खर्च केला आहे.

 

२०२१ – २२ या आर्थिक वर्षाकरीता वैद्यकीय सहाय्य याेजनेसाठी सुमारे ४ काेटी २० लाख रुपयांची तरतुद केली गेली हाेती. यापैकी सुमारे १ काेटी १८ लाख रुपये १४९ बिलांपाेटी खर्ची पडले आहे. याचवर्षी माजी नगरसेवकांसाठी सुमारे १ काेटी २१ लाख रुपये खर्ची पडले आहेत. तर या आर्थिक वर्षात एक लाखाहून अधिक रक्कम असलेली सुमारे ५७ बिले आहेत.

‘‘ काेराेना कालावधीत सर्वसामान्य नागरीकांचे वैद्यकीय खर्चामुळे गणित बिघडले हाेते. अशा काळात नागरीकांना सरकारी रुग्णालयात दाखल केले गेले. परंतु नगरसेवकांची बिले पाहता ही शहरातील नामांकित रुग्णालयाची असल्याचे स्पष्ट हाेत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.