-MPC-TOP-MOST-BANNER-I

Pune News : ‘वडील जेवण करत नाहीत, जरा पोलिसांची भीती दाखवा’ ; तरूणीचा पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला फोन अन्…

-MPC-FIRST-TOP-BANNER-I

एमपीसीन्यूज : पुणे शहरात कुठे अनुचित प्रकार घडला असेल, कुणाला मदत पाहिजे असेल, एखाद्या गुन्ह्याची माहिती द्यायची असेल तर पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला संपर्क साधता यावा यासाठी 100 नंबर आहे. परंतु पुणे पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला बुधवारी रात्री एक असा फोन आला की समोरील व्यक्तीचे बोलणे ऐकून काही काळासाठी सर्व स्तब्ध झाले.

पुण्याच्या खडक पोलीस स्टेशनच्या हद्दीतील एका तरूणीचा पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला रात्रीच्या वेळी फोन आला आणि तिने ‘वडील खूप त्रास देतात; जेवण करत नाहीत, जरा पोलिसांची भीती दाखवा’ असे पोलिसांना सांगितले. पोलिसांनीही नेहमीप्रमाणे या कॉलची गंभीर दखल घेतली आणि तातडीने काही मार्शल घटनास्थळी पोहोचले.

-MPC-SECOND-TOP-BANNER-I

पोलिसांना घरी पाहताच या तरुणीच्या वडिलांनीही कुठलाही त्रास न देता जेवण तर केलंच पण त्रास न देण्याचे वचनही दिले. त्यानंतर आता पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला या तरुणीने केलेला कॉल सोशल मीडियामध्ये व्हायरल झाला आणि शहरभर त्याची चर्चा सुरू झाली..

बुधवारी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास या तरुणीने नियंत्रण कक्षाला फोन केला. आणि घाबरत घाबरतच वडील कशाप्रकारे त्रास देतात, जेवण करण्यासाठी कसे नकार देतात हे सांगतानाच तुम्ही जरा पोलिसांची भीती दाखवा म्हणजे ते ऐकतील अशी विनंती देखील केली. दरम्यान नेहमी येणाऱ्या कॉल पेक्षा हा कॉल जरा वेगळा वाटल्याने पोलिसांनीही याची दखल घेतली आणि तातडीने काही मार्शल तरुणीच्या घरी दाखल झाले.

संपूर्ण प्रकार ऐकून घेतल्यानंतर या मार्शलनी कधी दरडावत तर कधी प्रेमाने या आजोबांची समजूत काढली. त्यानंतर आजोबांनीही यानंतर कधी कुटुंबीयांना त्रास न देण्याचे वचन दिले. अशाप्रकारे पोलिसांनी नियंत्रण कक्षाला आलेल्या अनोख्या कॉलचे निरसन केले.

-MPC-BOTTOM-BANNER-I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

.