Pune News : महिलेकडून खोट्या तक्रारीची भीती; एकाने केला ब्लेडने हात कापून आत्महत्येचा प्रयत्न

0

एमपीसी न्यूज – महिला आपल्या विरुद्ध खोटी तक्रार करणार असल्याच्या भितीने एका व्यक्तीने ब्लेडने हात कापून आत्महत्येचा प्रयत्न केला. हि घटना मंगळवारी (दि.15) सकाळी आठच्या सुमारास एरंडवणे येथील अलंकार पोलीस ठाण्यासमोर घडली.

याप्रकरणी अलंकार पोलीस ठाण्याच्या पोलीस उपनिरीक्षक स्नेहल जाधव यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या इसमाविरोधात 309 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तीने एक महिला आपल्या विरुद्ध खोटी तक्रार करणार असल्याच्या भितीने ब्लेडने डावा हात कापून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.

अलंकार पोलीस अधिक तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.