Pune News : शिक्षण समितीत मोजके पदवीधर; उर्वरीत अल्पशिक्षित सदस्यांचा भरणा !

एमपीसी न्यूज : विद्येचे माहेरघर असलेल्या पुणे महापालिकेच्या शिक्षण समितीवर नव्याने पक्षीय बलाबल नुसार 13 सदस्यांची निवड घोषित करण्यात आली. यामधील काही बोटांवर मोजण्या इतके पदवीधर वगळता उर्वरीत अल्पशिक्षित, ‘नॉनमॅट्रीक’ सदस्यांचा भरणा केला आहे. तसेच या निवडीनंतर उपसूचना देत अध्यक्षांसह उपाध्यक्षांना चारचाकी वाहन सुविधा देण्याचा धक्कादायक निर्णय सर्वपक्षीयांकडून घेण्यात आला आहे

ऑनलाइन मुख्य सर्वसाधारण सभेत मुदत संपलेल्या 8 सदस्यांसह नव्याने स्थापन केलेल्या शिक्षण समितीवर 13 सदस्यांची नियुक्ती करण्यात आली.

_MPC_DIR_MPU_II

त्यामध्ये भाजपाचे मंजुश्री खर्डेकर, कालिंदा पुंडे, राजश्री काळे, मुक्ता जगताप, मारूती तुपे. अल्पना वर्पे, वर्षा साठे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सुभाष जगताप, लता धायरकर, बाबुराव चांदेरे, सुमन पठारे. काँग्रेस पक्षाचे अविनाश बागवे, तर शिवसेनेकडून प्राची आल्हाट यांना संधी देण्यात आली.

या घोषणे दरम्यान शिक्षण समिती अध्यक्षांचे कार्यालय हे शिक्षण मंडळाच्या इमारतीत असावे. तसेच समितीच्या अध्यक्षांसह उपाध्यक्ष दोघांना स्वतंत्र चारचाकी वाहन व्यवस्था असावी, अशी उपसूचना मंजूरही करण्यात आली आहे.

मुळात कुठल्याही समितीच्या अध्यक्ष पदाव्यतिरिक्त उपाध्यक्ष पदासाठी स्वतंत्र चारचाकी वाहन देण्याचा ऐतिहासीक निर्णय सत्ताधाऱ्यांसह विरोधी पक्षांकडून मंजूर करण्यात आल्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.