_MPC_DIR_MPU_III

Pune News : सातव्या वेतन आयोगावर 10 मार्चला अंतिम निर्णय : उपसूचनांचा पाऊस, ऑनलाइन जीबी तहकूब

एमपीसी न्यूज : पुणे महापालिकेच्या प्रशासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्यावर निर्णय घेण्यासाठी आज म्हणजे बुधवारी (दि.24) ऑनलाइन मुख्य सर्वसाधारण सभा (जीबी) आयोजित केली होती. परंतु सर्वपक्षीय नगरसेवक नगरसेविकांकडून उपसूचनांचा पाऊस पाडण्यात आल्यामुळे कुठलाही निर्णय न घेता सत्ताधाऱ्यांवर जीबी तहकूब करण्याची नामुष्की ओढावली.

_MPC_DIR_MPU_IV

पुणे महापालिकेतील प्रशासकीय अधिकारी आणि कर्मचारी यांना गेल्या दीड वर्षांपासून रखडलेला सातवा वेतन आयोग लागू करण्यावर आजच्या ऑनलाइन जीबीत अंतिम निर्णय होणे अपेक्षित होते. परंतु सत्ताधारी भाजपसह सर्वपक्षीय नगरसेवक – नगरसेविकांनी घरभाडे भत्ता, धुलाई भत्ता अशा वेतन आयोगा संदर्भात उपसूचनांचा पाऊस पाडला. या सर्व उपसूचनांवर चर्चा करून निर्णय घेणे शक्य नसल्याचे कारण पुढे करत अवघ्या पाच मिनिटात जीबी तहकूब केली.

_MPC_DIR_MPU_II

सभागृह नेता गणेश बीडकर यांनी तहकुबीचा प्रस्ताव ठेवला. दरम्यान तहकुबीपुर्वी शहर उपनगरातील कोरोना परिस्थितीवर चर्चा करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही नगरसेवकांनी केली. परंतु महापौर मुरलीधर मोहोळ यांनी त्यावर भाष्य न करता तहकुबीची घोषणा केली.

पुढील महिन्यात 10 मार्च रोजी खास मुख्य सभेत वेतन आयोगाची अंमलबजावणीसह अन्य उपसूचनांवर साधक बाधक चर्चा करून अंतिम निर्णय होणार आहे. त्यामुळे पुणे महापालिकेच्या हजारो प्रशासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांना आणखी एक महिना वाट पाहावी लागणार आहे.

_MPC_DIR_MPU_I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.