Pune News : वित्त समिती संदर्भात चर्चा करावी : महापौर

एमपीसी न्यूज – विविध राजकीय पक्षाचे गटनेते, पदाधिकारी यांच्या सोबत वित्त समिती संदर्भात चर्चा करावी, अशी स्पष्ट सूचना महापौर मुरलीधर मोहोळ यांनी केली.

शासनाच्या आदेशानुसार आज पुणे महापालिकेची सर्वसाधारण सभा घेण्यात आली. पृथ्वीराज सुतार म्हणाले, वित्त समिती नेमली, पण अनेक कामे प्रलंबित आहेत. कोणत्याही परिस्थितीत चालू कामे खोळंबू नये, ठराविक कामे सुरू आहेत, आशा एकाधिकारशाहीला शिवसेनेचा विरोध आहे.

आबा बागुल म्हणाले, महापालिकेच्या तिजोरीत अडीच हजार कोटी रुपये आहेत. निवडणूक पार्श्वभूमीवर प्रत्येकाला काम करायचे आहे. जनतेमधून निवडून यायचे आहे. मिळकत करामध्ये चांगली वाढ झाली आहे. दीड वर्षे झाले सभा झाली नाही. चांगल्या विकासासाठी प्रशासनावर दबाव हवा.

दीपाली धुमाळ म्हणाल्या, गफूरभाई पठाण यांचा चांगला विषय आहे, वित्त समिती कशाला नेमली? 30 टक्के बजेटला कशाची मान्यता घायची, ही समिती रद्द करा, शहरात नालेसफाई झाली नाही. पावसाळा अगदी तोंडावर आहे.

सभागृह नेते गणेश बिडकर म्हणाले, गफूरभाई पठाण यांच्या विषयावर कोणालाही विरोध नाही. त्या कामासाठी काय उपयोग आहे, त्याचा विचार करू. बजेट हा विषय सर्वांचा आवडीचा विषय आहे, शासनाने कामे करू नये, असे म्हटले होते, मनपा पैसे निर्माण करीत असेल तर काहीही हरकत नाही. मागील वर्षी सारखी स्थिती यावर्षी कळू द्या. कोरोनाची पहिली लाट जाऊन दुसरी लाट आली. पीएमपीएमएल आर्थिक तूट आहे, काय अडचण आहे, मागील वर्षी कोरोना लाटेत सुद्धा 4 हजार 600 कोटी महसूल जमा झाला. याचा आम्हा सर्वांना अभिमान पाहिजे. वित्त समिती काय स्टेट्स आहे, ठरविणार की नाही, 30 टक्के बजेट देताना सभासदांना विचारात घेतले पाहिजे.

गटनेता, स्थायी समिती सदस्य, पदाधिकारी या सर्वांना समान न्याय मिळावा, असे शिवसेना नगरसेवक विशाल धनवडे म्हणाले.

आयुक्त म्हणाले, बजेट करताना धोरण ठरवितो, कोरोना पहिली, दुसरी लाट आली, तिसरी लाट कशी असणार ते सांगता येत नाही. 4 हजार 67 कोटी जेवढा बॅलन्स तेवढा खर्च झाला. 8 हजार 360 कोटी खर्च होईल. जीबी ने 7 वा वेतन आयोग मंजूर केला, 500 कोटी भार बसला. Pmpml ला ही 7 वा वेतन आयोग लागू होऊन 150 कोटी रुपये वाढले. 1200 कोटी वाढ झाली. 5 हजार 500 -600 कोटी पर्यंत जाऊ, 1300 कोटी पर्यंत जाणार आहे. तर, मनपा दिवाळखोरीत काढली गेली हे 4 वर्षे आम्ही हेच सांगतोय, असे स्वीकृत नगरसेवक सुभाष जगताप म्हणाले. राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनीही महापालिकेच्या कारभारावर टीका केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.