Pune News : जाणून घ्या, पुण्यातील विकेंड लॉकडाऊनमध्ये काय असेल सुरु आणि काय बंद

एमपीसी न्यूज – राज्य सरकारने आज संध्याकाळी ते सोमवार सकाळी पूर्णपणे लॉकडाऊन जाहीर केला आहे, हा विकेंड लॉकडाऊन संध्याकाळी सहा ते सोमवार सकाळी 7 वाजेपर्यंत चालू राहणार आहे.

या कालावधीत दिवसा जमावबंदी आणि रात्री संचारबंदी करण्यात आली आहे.

  • आजपासून सोमवारी सकाळी सातपर्यंत संचारबंदी.. केवळ मेडिकल आणि दूध विक्री वगळता सर्व दुकाने बंद.. सकाळी 6 ते 11 या वेळेतच दूध विक्रीला परवानगी
  • महापालिका हद्दीतील परीक्षार्थी विद्यार्थ्यांना या काळात प्रवासासाठी परवानगी असेल.. प्रवास करताना विद्यार्थ्यांनी हॉल तिकीट सोबत ठेवणे बंधनकारक आहे.
  • पुणे महानगर पालिका हद्दीतील खानावळी या फक्त पार्सल सेवेसाठी सकाळी 7 ते सायंकाळी 8 या वेळेत सुरू राहतील.
  • महापालिका हद्दीतील ज्या बांधकामाच्या ठिकाणी कामगारांची राहण्याची व्यवस्था आहे असे बांधकाम शनिवार व रविवार सुरु राहील.
  • महापालिका हद्दीतील घर काम करणारे कामगार, वाहनचालक, स्वयंपाकी, ज्येष्ठ नागरिक, आणि आजारी असणाऱ्या लोकांना सेवा देण्यासाठी वैद्यकीय मदत/ नर्स यांना आठवड्यातील सर्व दिवस प्रवास करण्यास मुभा राहील
  • लसीकरण सुविधा आठवड्यातील सर्व दिवस सुरु राहील
  • महापालिका हद्दीतील मद्य विक्रीच्या दुकानांना राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या नियमाप्रमाणे होम डिलिव्हरी सुविधेसाठी सोमवार ते शुक्रवार सकाळी 7 ते सायंकाळी 6 या वेळेत सुरु राहतील.
  • PMPML सेवा अत्यावश्यक सेवा वगळून शनिवार रविवार बंद राहणार
    – अत्यावश्यक सेवा कारणास्तव ओला / उबेर सुरू राहणार
  • कामगारांना प्रवास करताना RTPCR प्रमाणपत्र सोबत बाळगावे लागणार
  • कोरोना नियम पाळून औद्योगिक वसाहत सुरु राहणार

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.