Pune News :भवानी पेठेतील मणिभवन वाडा येथे आग ,एकाचा मृत्यू

एमपीसी न्यूज-भवानी पेठेतील पालखी विठोबा चौकाजवळ मणिभवन या जुन्या लाकडी वाड्याला (Pune News) काल रात्री आग लागली. अग्निशमन दलाचे कर्मचारी तात्काळ घटना स्थळी पोहचले  व त्यांनी आग आटोक्यात  आणली . परंतू या दुर्घटनेत गंभीर जखमी झालेले निलेश ठक्कर(वय 70) यांचा रुग्णालयात नेत असताना मृत्यू झाला आहे.

MPC News Podcast 03 February 2023 – ऐका…आजचे एमपीसी न्यूज पॅाडकास्ट

निलेश ठक्कर हे या वाड्यात एकटेच राहत होतेे.  या जुन्या लाकडी वाड्याला रात्री साडेअकराच्या सुमारास  अचानक आग लागली. या घटनेची माहिती अग्निशमन दलाला मिळताच ते तात्काळ घटना स्थळी पोहचले .अग्निशमन दलाचे केंद्र प्रमुख गजानन पाथ्रुडकर, राजेश जगताप, प्रदीप खेडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली जवानांनी पाण्याचा मारा करुन अर्धा तासात आग आटोक्यात आणली.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.