Pune News :कॅन्टोन्मेंट रुग्णालयाला लागलेल्या आगीवर नियंत्रण; अग्निशमन दलाच्या जवानांनी अर्ध्या तासांत विझवली आग

शॉर्टसर्किटमुळे ही आग लागल्याचे ही अग्निशमन दलाच्या जवानाकडून सांगण्यात आले.

एमपीसीन्यूज : पुणे कँटोन्मेंट बोर्डाच्या सरदार वल्लभाई पटेल रुग्णालयातील ऑपरेशन थिएटरमध्ये अचानक आग लागली. मात्र, अग्निशमन दलाच्या जवानांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत अर्ध्या तासात या आगीवर नियंत्रण मिळवले. आज, शनिवारी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास हि दुर्घटना घडली. सुदैवाने या आगीत कोणतीही जीवित हानी झाली नाही.

शॉर्टसर्किटमुळे ही आग लागल्याचे ही अग्निशमन दलाच्या जवानाकडून सांगण्यात आले.

गोळीबार मैदानाजवळ असलेल्या या रुग्णालयाच्या ऑपरेशन थेटरमधून सकाळी अकराच्या सुमारास धूर येताना दिसला. त्यानंतर आग लागल्याचे समजताच रुग्णालयात एकच धावपळ उडाली.

रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी अग्निशमन दलाच्या जवानांना फोन करून आगीची माहिती दिली. त्यानंतर अग्निशमन दलाच्या तीन गाड्यांनी घटनास्थळी धाव घेत अवघ्या काही मिनिटात आगीवर नियंत्रण मिळविले.

आग लागली तेव्हा रूग्णालयात काही रुग्ण होते. प्रसंगावधान राखत कर्मचाऱ्यांनी त्यांना सुरक्षित ठिकाणी हलविले.

रुग्णालयाच्या वरच्या मजल्यावर आग लागल्यामुळे सुरुवातीला अग्निशमन दलाच्या जवानांना अडथळ्यांचा सामना करावा लागला. परंतु अथक प्रयत्नानंतर त्यांनी अर्ध्या तासानंतर आगीवर नियंत्रण मिळविले.

मात्र, आगीत किती नुकसान झाले तसेच आग लागल्याचे नेमके कारण अद्याप कळू शकलेले नाही.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.