Pune News : दिवाळीत फटाके बंदी करावी; राष्ट्रवादीच्या नेत्याची अजित पवारांकडे मागणी

एमपीसी न्यूज – दिवाळीमध्ये फटाक्यांच्या धुरामुळे अनेकांना श्वसनाचे विकार होतात. शोभेच्या दारूमुळे वायुप्रदूषण दूध मोठ्या प्रमाणात होतो. त्यामुळे कोरोना रुग्ण वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे दिवाळीत फटाक्यांवर बंदी घालण्यात यावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी आणि पुण्याचे माजी महापौर अंकुश काकडे यांनी केली.

यासंदर्भात त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना एक निवेदन पाठवले आहे. मुख्यमंत्री अजित पवार यांना पाठविलेल्या निवेदनात अंकुश काकडे म्हणतात, कोरोनाचे संकट अजूनही टळले नाही. ज्यांना श्वसनाचे विकार आहेत त्यांना कोरोनाचा संसर्ग लगेच होतो. म्हणून अगोदरच काळजी घेणे गरजेचे आहे. त्यासाठी या दिवाळीत फटाके अथवा शोभेची दारू उडवण्यास बंदी करावी.

त्यामुळे आता उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्याच पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या या मागणीकडे कशाप्रकारे पाहतात हे हे पाहावे लागेल.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.