Pune News : आधी ठेकेदार ठरवायचा मग टेंडर, सत्ताधारी भाजपचा नवा पायंडा : दीपाली धुमाळ  

एमपीसीन्यूज  : कोरोनाच्या परिस्थितीमध्ये लसीकरण हा एकमेव मार्ग दिसत असताना लस खरेदीसाठी राज्य सरकारकडे बोट दाखवणाऱ्या सत्ताधारी भाजपचे पितळ उघडे पडले आहे. मुंबई महानगरपालिकेने लशींचे  टेंडर मागविले असून त्यामध्ये सहभागी कंपन्यांना संपर्क करुन लस खरेदी करावी, अशी मागणी विरोधी पक्ष नेत्या दिपाली धुमाळ यांनी माहपालिकेकडे केली आहे.

तसेच दिपाली धुमाळ यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पत्र पाठविले आहे.  पुणे महानगरपालिका प्रशासनावर दबाव आणून 5 ते 7 वर्षांचे टेंडर कालावधी घेण्याचा अट्टाहास केला जात आहे. या टेंडरच्या अटी व शर्ती पाहता ठेकेदार आधीच ठरला आहे, ठेकेदारांची माणसे सर्व नियम अटी शर्ती बनवून देतात आणि प्रशासन त्याला होकार देते असा नवीन पायंडा पुणे महानगरपालिकेत पडला आहे.

हा पायंडा बंद करावा, अशी मागणी त्यांनी उपमुख्यमंत्री  पवार यांच्याकडे निवेदनातून केली आहे. सत्ताधारी भाजप पुणे महानगरपालिका प्रशासनावर दबाव आणून टेंडर प्रक्रिया राबवत असल्याचा आरोपही  धुमाळ यांनी केला आहे.

पुणे महानगरपालिका हद्दीतील ड्रेनेज लाईन व पावसाळी लाईनमधील गाळ काढायचे काम वर्षानुवर्षे  होत असून यावर्षी 7 वर्षाच्या कालावधीसाठी 34  कोटी रुपयांचे टेंडर काढण्यात आले आहे. या टेंडरच्या अटी व शर्ती पाहता ठेकेदार आधीच ठरला आहे, ठेकेदारांची माणसे सर्व नियम अटी शर्ती बनवून देतात आणि प्रशासन त्याला होकार देते असा नवीन पायंडा महानगरपालिकेत पडला आहे.

तसेच सुरक्षा विभागाने 30 कोटी रकमेचे टेंडर काढले असून त्यातील अटी बघितल्या असता भाजपच्या आमदारांशी संबंधित कंपन्या यामध्ये पात्र होणार आहेत. शहरातील नदीतील जलपर्णी काढण्याबाबतची निविदा प्रक्रिया किंवा पालिकेचे 30 वाहनतळ चालविण्यास देण्याचे टेंडर पाहता सत्ताधारी सत्ताधारी पक्षाने ठेकेदारांसाठीच काम करायचे ठरवले आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.

पुणेकरांच्या कररूपी पैशांची विविध टेंडरच्या माध्यमातून धुळदाण उडविली जात आहे. कोरोनाच्या काळात गोंधळ घालू, नंतर आपली सत्ता नाही, आपण कशासही उत्तरदायित्व नाही, अशा भावनेने पुणे महानगरपालिकेत गैरव्यवहार चालू आहेत. मार्च 2020 पासून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने जास्तीत जास्त कामे पुढे ढकलण्याचे आदेश दिले आहेत. या आदेशाला केराची टोपली दाखविली गेली आहे.

महापालिकेचे होणारे आर्थिक नुकसान बघता सर्व वादग्रस्त टेंडर स्थगित करण्याचे आदेश महापालिका आयुक्त यांना करावेत अशी विनंती या पत्राद्वारे उपमुख्यमंत्री पवारांकडे  धुमाळ यांनी केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.