Pune News : कोथरुडमध्ये एकाच इमारतीत पाच फ्लॅट फोडले

एमपीसी न्यूज – कोथरुड भागात चोरट्यांनी एकाच इमारतीतील 5 फ्लॅट फोडले आहेत. यामुळे घरफोड्या करणा-या टोळ्या आता जास्तच सक्रिय झाल्या असून घरफोड्या रोखण्याचं आव्हान पोलिसांसमोर आहे.

संतोष देशपांडे (वय 50) यांनी याप्रकरणी कोथरुड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, देशपांडे हे कोथरूड येथील उजवी भुसारी कॉलनीत श्वेता रेसिडेन्सी इमारतीत राहण्यास आहेत. याच इमारतीत त्यांचे ऑफिस आहे. त्यांनी ऑफिस कुलूप लावून बंद केले होते.

चोरट्यांनी त्यांच्या ऑफिसचे कुलूप उचकटून आत प्रवेश केला. तसेच आत चोरी करण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या शेजारी असणारे आणखी चार फ्लॅट फोडण्यात आले आहेत.

यातील एक फ्लॅट कोल्हापूर येथील व्यक्तीचा आहे. ते गावी असून, त्यांच्या घरातून काही किमती ऐवज चोरीला गेला आहे. पण किती मुद्देमाल चोरीला गेला हे समजू शकलेले नाही. मात्र इतर चार फ्लॅटमधून चोरट्यांच्या हाती काही लागलेले नाही.

कोथरूड पोलीस अधिक तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.