Pune News : पुण्याजवळील भाटघर धरणात पाच महिला बुडाल्या

एमपीसी न्यूज –  पुण्याजवळील भाटघर धरणात पाच विवाहित महिलांचा बुडून मृत्यू झाला, तर महिलांचा शोध घेण्याचे काम रात्री उशीरापर्यंत चालू  होत. गुरुवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास भाटगर धरणाचा नरे गावच्या तीरावर ही घटना घडली. त्यातील एक मुलगी सुदैवाने बचावली आहे. 
या प्रकरणी प्राथमिक माहिती अशी की, सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास भाटघर धरणाच्या जलाशयात पाच ते सहा महिला बुडाल्याची माहिती स्थानिक नागरिकांना मिळाली होती. स्थानिक नागरिकांनी यातील पाच महिलांचे मृतदेह बाहेर काढले आहेत.

तर घटनास्थळी दाखल झालेल्या प्रांताधिकारी राजेंद्र कचरे, तहसीलदार सचिन पाटील आणि राजगड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सचिन पाटील यांच्या सह्याद्री सर्च अँड रेसकोर्स जवानांनी शोधकार्य सुरू केले.

या दुर्घटनेत एकूण  पाच महिलांचा मृत्यू झाला.

खुशबू लंकेश राजपूत, मनीषा लखन राजपूत, चांदनी शक्ती राजपूत, पुनम संदीप राजपूत आणि मोनिका रोहित चव्हाण अशी मृत्युमुखी पडलेल्या महिलांची नावे आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.