_MPC_DIR_MPU_III

Pune News : सीरमच्या ‘त्या’ आगीत पाच जणांचा दुर्दैवी मृत्यू; मृतांमध्ये चार पुरूष, एक महिला

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे शुक्रवारी 'सीरम'ला भेट देणार

एमपीसी न्यूज : सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाच्या मांजरी येथील बीसीजी प्लान्ट मधील आग आटोक्यात आल्यानंतर अग्निशमन दलाचे जवान आणि एनडीआरएफच्या जवानांना पाच मृतदेह आढळून आले. सर्व मृतदेह ससून सर्वोपचार रुग्णालयात रवाना झाले आहेत.

मृतांमध्ये प्रतिक पाष्टे (रा. नऱ्हे पुणे), महेंद्र इंगळे (रा. डेक्कन पुणे), रमा शंकर हरिजन (रा. उत्तर प्रदेश), बिपीन सरोज (रा. उत्तर प्रदेश), सुशिल कुमार पांडे (रा. बिहार) यांचा समावेश आहे. सर्व मृतदेह ससून सर्वोपचार रुग्णालयाकडे रवाना झाले असल्याची माहिती अग्निशमन विभागासह सीरमच्या विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे.

दरम्यान सीरमचे सर्वेसर्वा आदर पुनावाला यांनी दुपारी आगीमध्ये कोणतिही जिवीतहानी झाली नसल्याचे ट्विट केले होते. परंतु आग आटोक्यात आल्यानंतर कुलिंग कामाच्या दरम्यान बचावकार्य सुरु होते. त्यावेळी आर-बीसीजी प्लान्ट इमारतीच्या पाचव्या मजल्यावर पाच मृतदेह आढळले.

_MPC_DIR_MPU_II

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे शुक्रवारी ‘सीरम’ला भेट देणार

सीरम इन्स्टिट्यूटच्या बीसीजी प्लान्टच्या इमारतीला लागलेल्या आगीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उद्या (शुक्रवारी दि.22 जानेवारी) दुपारी 3.30 च्या सुमारास घटनास्थळी भेट देत पाहणी करणार आहेत.

काही वेळापूर्वी सिरम इन्स्टिट्यूटचे आदर पुनावाला यांच्याशी तसेच पुणे महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांच्याशी दुरध्वनीवरील संपर्कातून घटनेचा आढावा घेतला आहे. त्या प्रमाणेच उपमुख्यमंत्री अजित पवार, पुणे विभागीय आयुक्त सौरभ राव आणि पुणे जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांच्याशी संपर्क ठेवत आढावा घेतला.

तसेच उपमुख्यमंत्री पवार आज (गुरूवारी) रात्री 8 च्या सुमारास सीरम येथील घटनास्थळी भेट देणार असून मुख्यमंत्री ठाकरे उद्या पुणे दौऱ्यावर येणार आहेत.

 

_MPC_DIR_MPU_I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

_MPC_POSTEND_MAT_1