Pune News : ‘एमपीएससी’च्या उत्तीर्ण विद्यार्थ्यांना पालिकेकडून पाच हजारांची मदत

एमपीसीन्यूज : पुणे महापालिका हद्दीतील महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) पूर्व परीक्षेत उत्तीर्ण होणार्‍या पहिल्या शंभर विद्यार्थ्यांना मुख्य परीक्षेच्या तयारीसाठी प्रत्येकी पाच हजार रुपये देण्याच्या प्रस्तावास महापालिकेच्या स्थायी समितीने मंजुरी दिली आहे.

महापालिका हद्दीतील अनेक विद्यार्थी एमपीएससीच्या परीक्षेला बसतात. या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्याकरिता महापालिकेने पुस्तके खरेदीसाठी पाच हजार रुपये मदत द्यावी, असा प्रस्ताव स्थायी समितीसमोर ठेवण्यात आला होता. त्याला सोमवारी स्थायीने मंजुरी देण्यात आली.

या प्रस्तावानुसार एमपीएससीच्या पूर्व परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या पहिल्या शंभर विद्यार्थांना या योजनेत प्रत्येकी 5 हजार रुपये मदत दिली जाणार आहे. या विद्यार्थ्यांना मुख्य परीक्षेच्या तयारीसाठी आवश्यक पुस्तके या निधीतून खरेदी करता येणार आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.