Pune News : महिला दिनानिमित्त पुष्परचना व सजावट कार्यशाळा संपन्न

एमपीसी न्यूज – ग्रोवर्स फ्लॉवर कौन्सिल ऑफ इंडिया व उगम फाउंडेशन हडपसर यांच्या संयुक्त विद्यमाने महिला दिनाच्या निमित्ताने पुष्परचना व पुष्पसजावट कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.

6 मार्च 2021 रोजी सकाळी दहा ते दुपारी एक या कालावधीत पोदार जम्बो कीड स्कूल मांजरी येथे हा कार्यक्रम संपन्न झाला.

चिंचवड येथील स्नेह फ्लोरिस्टचे संचालक पंढरीनाथ म्हस्के यांनी प्रात्यक्षिकांसह महिलांना मार्गदर्शन केले. दहा-दहाच्या तीन गटांना त्यांनी वेगवेगळ्या फुलांच्या रचना सादर केल्या.

_MPC_DIR_MPU_II

ताज्या फुलांची आवड व दैनंदिन जीवनात या फुलांचा वापर वाढवून कोरोना महामारीने आलेली मरगळ झटकून एक सकारात्मक वातावरण निर्माण व्हावे व महिलांना स्वयंरोजगार करण्यास प्रोत्साहन मिळावे या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, असे ग्रोवर्स फ्लॉवर कौन्सिल ऑफ इंडियाचे संचालक धनंजय कदम यांनी सांगितले.

उगम फाउंडेशनच्या संस्थापिका चेतना बिडवे यांनी पुष्परचना व पुष्प सजावट कार्यशाळेतून मार्गदर्शन घेऊन आत्मनिर्भर व्हावे व स्वावलंबी व्हावे, असे आवाहन केले.

प्रास्ताविक ज्योती सातव यांनी केले. अनिता गायकवाड यांनी आभार मानले.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ग्रोवर्स फ्लॉवर कौन्सिल ऑफ इंडियाचे संचालक धनंजय कदम, के एफ बायोप्लँटचे जनरल मॅनेजर आशिष फडके, रोहन जाधव, स्मिदर्स ओऍसिसचे जनरल मॅनेजर होमेन रसेल व जिगर राणा, उगम फाउंडेशनच्या संस्थापिका चेतना बिडवे, सोएक्स फ्लोरा, माधवी ऍग्रो, त्रिमूर्ती फ्लॉवर्स यांनी परिश्रम घेतले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.