Pune News : सार्वजनिक आरोग्याच्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करा : डॉ. महेश एम. लाखे

एमपीसी न्यूज – भारतभर कोविडच्या घटनांमध्ये मागील काही दिवसात अचानक वाढ होत आहे. सुधारात्मक उपायांची काटेकोरपणे अंमलबजावणी न केल्यास आपणांस पुन्हा 2020 सारख्या परिस्थितीचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे सार्वजनिक आरोग्याच्या सर्व मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करावे, असे आवाहन कोलंबिया आशिया रूग्णालयाचे संसर्गजन्य रोग सल्लागार डॉ. महेश एम. लाखे यांनी केले आहे.

आर्थिक गरजेपोटी कामे करताना कोविडच्या नियमांचे पालन न करणे व लोकांचे बेपर्वा वर्तन हे यामागील प्रमुख कारण आहे. पहिल्या लाटेमध्ये साथीचा आजार झपाट्याने पसरत होता. मात्र अजूनही हा साथीचा आजार संपलेला नाही ही वस्तुस्थिती आहे. लोक विचार करू लागले आहेत की लसीमुळे विषाणूचा नाश होईल, मात्र वस्तुस्थिती अशी नाही.

_MPC_DIR_MPU_II

महाराष्ट्र, कर्नाटक, पंजाब, गुजरात, तामिळनाडू, उत्तर प्रदेश, हरियाणा आणि मध्य प्रदेशात सध्या जोर दिसत आहे. जर आरटी-पीसीआर चाचणी लोकसंख्येचा योग्य प्रमाणात होत नसेल तर ती सक्रिय संक्रमणाची अचूक संख्या देऊ शकत नाही. ज्या लोकांमध्ये रोगप्रतिबंधक लस टोचलेली आहे त्यांच्यात रोग प्रतिकारशक्ती निर्माण होईल. परंतु ज्यांना लसी दिली गेली नाही ते या रोगास असुरक्षित राहतात. ही संख्या निश्चितच खूपच मोठी आहे. त्यामुळे व्हायरस वेगाने पसरत असलेल्या परिस्थितीला उत्तेजन मिळते.

डॉ. महेश एम. लाखे यांनी सांगितले की, या परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी निश्चितच तात्काळ पावले उचलली पाहिजेत. सार्वजनिक आरोग्याच्या मार्गदर्शक सूचनांचे उल्लंघन करणाऱ्यांना दंड लागू करा. ज्याभागात प्रकरण नोंदविले गेले आहे, अशा ठिकाणी इमारत किंवा काही इमारतींचा मिनी किंवा मायक्रो कंटेन्ट झोन तयार करा. सक्रिय प्रकरणे शोधण्यासाठी आरटी-पीसीआर चाचणी संख्या वाढवा. सार्वजनिक आरोग्य मार्गदर्शक तत्त्वे आणि लसीकरण याबाबत जागृती करण्यासाठी सेलिब्रिटीज आणि इतर नामांकित व्यक्तींचा समावेश करा.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.