Pune News: आरटीई प्रवेश प्रक्रिया नियमानुसार राबवा ; राष्ट्रवादी युवक काँग्रेसची मागणी

एमपीसी न्यूज – शिक्षण हक्क (आरटीई) कायद्याअंतर्गत प्रवेश प्रक्रियेत अनेक एजंट या योजनेच्या नियमावलीत पात्र नसलेल्या पालकांकडून पैसे मागून प्रवेश प्रक्रियेत सहकार्य करण्याचे आमिष दाखवत आहेत. त्यामुळे ही प्रवेश प्रकिया नियमानुसार करावी, अशी मागणी पुणे शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेसने केली आहे.

याबाबत राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे सरचिटणीस गिरीश गुरनानी यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने शिक्षण उपसंचालक औदुंबर उकिरडे यांना निवेदन देण्यात आले आहे. आरटीई प्रवेश प्रक्रियेत खरोखरच आर्थिक दुर्बल असलेले पालक या योजनेपासून वंचित रहात आहेत.

_MPC_DIR_MPU_II

ऑनलाईन पद्धतीने प्रवेश प्रक्रिया असली तरी अनेक ठिकाणी सुरु असलेल्या या एजंटगिरीला बळी पडून पालकांची होत असलेली फसवणूक थांबविण्यात यावी. खऱ्या आर्थिक दुर्बल विद्यार्थ्यांनाच या प्रक्रियेचा लाभ मिळावा.

तीन फेऱ्यांमध्ये राबविली जाणारी ही प्रक्रिया एकाच फेरीत राबविताना कोणत्याही गरजू विद्यार्थ्यांवर अन्याय होणार नाही या दक्षता घ्यावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.

यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे संदेश कोतकर, रवी गाडे, अमोल गायकवाड, आकाश नागरे, साहिल मरे आदी उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.