Pune News : पुण्यात येणार्‍या परदेशी प्रवाशांची विमानतळावरच कोरोना चाचणी, रिपोर्ट येईपर्यंत करावी लागणार प्रतीक्षा

एमपीसी न्यूज – परदेशातून पुणे विमानतळावर येणाऱ्या प्रवाशांना विमानतळावरच कोरोना चाचणी करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या चाचणीचा रिपोर्ट आल्यानंतर प्रवाशांना क्वारंटाइन राहण्याची गरज भासणार नाही.

यासाठी लागणारे शुल्क प्रवाशांना कॅशलेस पद्धतीने देता येणार आहे. जिल्हा प्रशासनाच्या वतीने ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

वंदे भारत शिक्षण योजनेअंतर्गत आंतरराष्ट्रीय फ्लाईटने अनेक प्रवासी विमानतळावर येत असतात. यापूर्वी अशा प्रवाशांना क्वारंटाइन केले जात होते. परंतु आता याची गरज भासणार नाही. विमानतळ टर्मिनलच्या अराव्हल हॉलमध्ये कोरोना चाचणी केली जाणार आहे. या चाचणीचा रिपोर्ट येईपर्यंत प्रवाशांना मात्र प्रतीक्षा करावी लागणार आहे.

रिपोर्ट येईपर्यंत प्रवाशांना प्रतीक्षा करणे शक्य नसल्यास त्यांना हॉटेलमध्ये क्वारंटाइन होण्याचा पर्याय देखील ठेवण्यात आला आहे. रिपोर्ट निगेटिव्ह आल्यास प्रवाशांना घरीच क्वारंटाइन व्हावे लागेल. तर रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यास प्रवाशांना इन्स्टिट्यूटशनल क्वारंटाइन व्हावे लागणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.