Pune News: जलकेंद्र तोडफोड प्रकरणी माजी आमदार योगेश टिळेकर यांच्यासह पस्तीस जणांना अटक

​एमपीसी​ न्यूज ​- कोंढवा परिसरात नळाला पाणी येत नसल्याने स्वारगेट येथील जलक्षेत्रात आंदोलन करण्यासाठी आलेले भाजपचे माजी आमदार योगेश टिळेकर आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी जलकेंद्र परिसरात तोडफोड केल्या प्रकरणी योगेश टिळेकर यांच्या सह तीस ते पस्तीस कार्यकर्त्यांना स्वारगेट पोलिसांनी अटक केली. याप्रकरणी अशीत जाधव यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कोंढवा परिसरात पाणी येत नसल्याने योगेश टिळेकर आपल्या कार्यकर्त्यांसह स्वारगेट येथील जलकेंद्रात आज सकाळच्या सुमारास आंदोलन करण्यासाठी आले होते. यावेळी त्यांनी गोंधळ करीत जलकेंद्र कार्यालयातील वस्तू इतरत्र फेकल्या आणि तेथील कर्मचाऱ्यांनाही दमदाटी केली.

स्वारगेट पोलिसांना याची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत योगेश तळेकर यांच्यासह त्यांच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आणि या प्रकरणी गुन्हा दाखल केला. या सर्वांना अटक करून त्यांच्यावर गुन्हे दाखल केलाय आणि सर्वांना न्यायालयात हजर करण्यात आले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.