Pune News : माजी आमदार योगेश टिळेकर यांना जामीन, मिळाली होती 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी

एमपीसीन्यूज : सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी भारतीय जनता पक्षाचे माजी आमदार योगेश टिळेकर यांच्यासह चार नगरसेवक आणि भाजपच्या कार्यकर्त्यांना स्वारगेट पोलिसांनी अटक केली होती. त्यानंतर त्यांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने 14 दिवसांची पोलिस कोठडी सुनावली होती. परंतु, आज अखेर त्या सर्वांना जामीन मिळाला असून सायंकाळपर्यंत त्यांची सुटका होण्याची शक्‍यता आहे.

कोंढवा परिसरात नळाला पाणी येत नसल्याने स्वारगेट येथील जलक्षेत्रात आंदोलन करण्यासाठी आलेले भाजपचे माजी आमदार योगेश टिळेकर आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी जलकेंद्र परिसरात तोडफोड केल्याप्रकरणी योगेश टिळेकर यांच्यासह 40 जणांना स्वारगेट पोलिसांनी अटक केली होती.

त्यानंतर त्यांना न्यायालयात दाखल केले असता न्यायालयाने या सर्वांची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली होती.

दरम्यान, आज न्यायालयाने त्यांचा जामीन मंजूर केला आहे. त्यामुळे सायंकाळपर्यंत त्यांची सुटका होणार आहे. त्याचबरोबर त्यांच्यासह चार नगरसेवक आणि भाजपच्या कार्यकर्त्यांनाही जामीन मंजूर करण्यात आला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.