Pune News : होईल नगरसेवकांच्या चार पिढ्यांची कमाई पण ही तर पुणेकरांच्या चार पिढ्यांची बरबादी : आप

अ‍ॅमिनिटी स्पेस पुणेकरांच्या हक्काच्या!' अशा घोषणा देत आपचा आज परत विरोध!

एमपीसी न्यूज – शहरातील अ‍ॅमिनिटी स्पेस दीर्घकालीन म्हणजे 30 वर्षाच्या करारावर देण्याच्या योजनेला आम आदमी पक्षाने जाहीर विरोध केला आहे. आज मुख्य सभेत हा विषय येणार आहे. त्यामुळे आम आदमी पक्ष कार्यकर्त्यांनी दुपारीच महानगरपालिका पायऱ्यांवर ठिय्या देत निषेधाच्या घोषणा दिल्या.

स्थायी समितीने यास आधीच मान्यता दिली आहे . जवळपास 270 जागा या मार्गाने खाजगी विकसकांना उपलब्ध होतील.सुरुवातीस 30 वर्षे आणि नंतर 90 वर्षांपर्यंत हे करार होऊ शकतील. या धोरणाचा पुण्याच्या विकासावर दीर्घकालीन गंभीर परिणाम होणार आहेत. ‘सार्वजनिक मालमत्तेचे विश्वस्त’ असलेले नगरसेवक या जागा काही तात्पुरत्या फायद्यांसाठी खाजगीकरणाकडे वळवत आहेत, त्यातून ‘ज्याला परवडेल त्याला सुविधा’ असे धोरण तयार होते व सामान्य नागरिक वंचित ठरतो हे आपण शाळा व दवाखान्याबाबत अनुभवले आहे.

आता या जागा म्हणजे स्थानिक नागरिकांच्या गरजेनुसार, उद्दिष्टानुसार तयार करायच्या सुविधा असतात. खरेतर या जागा पुढच्या पिढीतील नागरिकांसाठी शहरीकरणातील फुफुसे असतात असे असताना 1700 कोटी एका फटक्यात मिळवून भावी पिढीसाठीच्या सुविधांचा बळी दिला जाणार आहे. हे तर ‘घर गहाण टाकून उचल’ मिळवण्याचे धोरण आहे. या सर्व बाबी विचारात घेता आम आदमी पक्ष या अ‍ॅमिनिटी जागा दीर्घकालीन भाडेकराराने देण्यास विरोध करीत आहे.

या वेळेस मुकुंद किर्दत, डॉ. अभिजित मोरे, संदीप सोनावणे, सईद अली, सतीश यादव , सुजित आगरवाल, अनिल धुमाळ, विक्रम गायकवाड, असगर बेग, साहिल मणियार, विकास कदम, किशोर मुजुमदार, नितीन पायगुडे, आकाश मूनियन, ललिता गायकवाड, वैशाली पारखे, विद्यानंद नायक, शंकर पोटघन, इरफान रोडे, सुदर्शन जगदाळे, रोहित आंधळे, मनोज थोरात, सूर्यकांत कांबळे, दीपक श्रोत्री, आनंद अंकुश, सादिक सय्यद, सुभाष नडे, सरफराज शेख, नरेंद्र देसाइ, विकास अंकुश, सुरेश पारखे, गणेश ढमाले, उमेश बगाडे, वेदांत भावनसे, गणेश वैराट, किरण कांबळे, आसिफ शेख, ऋषिकेश पवार, रोहन रोकडे, अतुल मडकर, सुहास पवार, साहिल क्षीरसागर, विकास लोंढे, अभिजीत परदेशी, दत्तात्रय कदम आदी उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.