Pune crime News : आयटी कंपनीतील नोकरीच्या आमिषाने महिलेची 8.60 लाखांची फसवणूक

एमपीसी न्यूज – ॲक्सेन्चर या आयटी कंपनीत नोकरी लावतो, असे सांगून एका महिलेची 8.60 लाख रूपयांची फसवणूक केली आहे. ऑनलाईन माध्यमातून संपर्क साधून ही फसवणूक करण्यात आली.

याप्रकरणी हडपसर येथील 43 वर्षीय महिलेने हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिलेला ऑनलाईन माध्यमाव्दारे अज्ञातांनी संपर्क साधला व श्रूती नायर, रोहित गुप्ता, प्रतिक वर्मा, आनंद, सुधाशु मिश्रा अशी खोटी नावे सांगितली.

आम्ही रिक्रृटमेंट इनडिड या कंपनी बोलत असल्याचे सांगून आम्ही तुंम्हाला ॲक्सेन्चर या आयटी कंपनीत नोकरी लावतो, असे त्यांनी सांगितले. त्यांनी वेगवेगळ्या प्रोसेसिंग फीच्या नावाखाली फिर्यादी यांच्याकडून 11 लाख 99 हजार 611 रूपये खात्यावर जमा करून घेतले.

त्यापैकी 3 लाख 39 हजार 014 रूपये त्यांनी फिर्यादी यांना परत केले. मात्र, उर्वरित रक्‍कम परत न देता त्यांची आर्थिक फसवणुक केली.

हडपसर पोलीस अधिक तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.