Pune News : महिला व ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत कायदेविषयक सल्ला केंद्र ; लायन्स क्लबचा पुढाकार

एमपीसी न्यूज – लायन्स क्लब इंटरनॅशनलतर्फे महिला व ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत कायदेविषयक सल्ला केंद्राचे उद्घाटन न्या. सुभाष हरताळकर, अंजली आपटे, लायन्स क्लबचे प्रांतपाल सीए अभय शास्त्री, यांच्या हस्ते झाले. कर्वे रोड येथे ऑनलाईन पद्धतीने 4 नोव्हेंबर रोजी या केंद्राचे उद्घाटन करण्यात आले.

पैशाअभावी न्यायालयात दाद मागू शकत नाहीत अशा स्त्रिया व ज्येष्ठ नागरिकांच्या मदतीसाठी लायन विधीज्ञ प्रीती परांजपे व विधीज्ञ दामोदर भंडारी मोफत सल्ला देणार आहेत. दर बुधवारी सायंकाळी चार ते सहा या वेळेत सदर मोफत कायदेविषयक सल्ला केंद्र सुरू राहील.

याप्रसंगी अनुराधा शास्त्री, परमानंद शर्मा, हिमांशू सराफ, सागर भोईटे, सोनिया गोळे, विधीज्ञ समीर परांजपे, विधीज्ञ दिव्या वाडेकर उपस्थित होते. तसेच, झूमद्वारे द्वितीय उपप्रांतपाल राजेश कोठावदे, व इतर मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन झोन चेअरपर्सन ॲड. प्रीती परांजपे यांनी केले. पाहुण्यांचा परिचय लायन्स प्रांताच्या अध्यक्षा साधना पाटील यांनी करून दिला. रिजन चेअरपर्सन लायन सुनिता मालपाणी यांनी आभार मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.