Pune News : सेट परिक्षार्थींसाठी मोफत ऑनलाईन कार्यशाळा

एमपीसी न्यूज – महाराष्ट्र व गोवा राज्यात होणाऱ्या राज्यस्तरीय पात्रता परीक्षेत अर्ज केलेल्या उमेदवारांसाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून मोफत ऑनलाईन कार्यशाळा घेण्यात येणार आहे.

विद्यापीठ अनुदान आयोगाच्या मान्यतेने, राज्य शासनाच्या वतीने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून महाराष्ट्र व गोवा राज्यातील उमेदवारांसाठी यंदा 26 सप्टेंबर 2021 रोजी राज्यस्तरीय पात्रता परीक्षा होणार आहे. उमेदवारांचे विविध प्रश्न व समस्या सोडविण्याच्या दृष्टिकोनातून 3 ते 5 ऑगस्ट दरम्यान सकाळी 10.30 ते दुपारी 04.00 या वेळेत कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.

या कार्यशाळेत सामान्य ज्ञान या विषयातील अभ्यासक्रम, प्रश्नपत्रिकेचे स्वरूप, निकाल, अभ्यासक्रम, आरक्षण, अर्जामधील बदल, गुणवत्ता यादी इत्यादींबाबत तज्ज्ञांकडून मार्गदर्शन केले जाईल. या कार्यशाळेचे उद्घाटन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. नितीन करमळकर करणार आहेत. ही कार्यशाळा  https://www.facebook.com/ecdlic  या लिंकवर live प्रक्षेपण करण्यात येईल.

परीक्षेत येणाऱ्या विविध समस्यांचे निराकरण व्हावे, तसेच परीक्षेच्या निकालमध्ये वाढ होण्यासाठी व्यापक हित लक्षात घेत या कार्यशाळेचे आयोजन केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.