Pune News : ‘भीम आर्मी’च्यावतीने पुण्यातील आरोग्य यंत्रणेची अंतयात्रा

एमपीसी न्यूज – पुणे शहरातील ढासळती आरोग्य व्यवस्था आणि प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष होत असल्याच्या निषेधार्थ भीम आर्मी बहुजन एकता मिशनच्यावतीने मंगळवारी (दि. 15 सप्टेंबर) सकाळी पुण्यातील आरोग्य यंत्रणेची अंत्ययात्रा काढण्यात आली.

भीम आर्मी बहूजन एकता मिशनचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष दत्ता पोळ यांच्या नेतृत्वाखाली पुणे महापालिकेच्या प्रवेशद्वारावर हे आंदोलन करण्यात आले.

या आंदोलनात संघटनेच्या जिल्हाध्यक्षा नीता आडसुळे, उपाध्यक्षा उषा राजगुरू, पुणे शहर कार्याध्यक्षा स्वाती गायकवाड , प्रदीप कांबळे, राहुल बनसोडे, मुकेश गायकवाड, भीमराव कांबळे, कन्हय्या पाटोळे, जालिंदर वाघमारे, निरंजन कांबळे, मामा बनसोडे, नितेश निकम, बाळू गायकवाड, अमित गायकवाड, अश्रफ खान, आकाश गंडगुले आदी सहभागी झाले होते.

पुण्यातील आरोग्य व्यवस्था ढासळली असून कोरोना संसर्गावर नियंत्रण राखण्यास पुणे महापालिका प्रशासन अपयशी ठरले आहे. आधुनिक आणि प्रगत असलेल्या पुण्यात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण असणे ही बाब अत्यंत लाजिरवाणी आणि शरमेची बाब असल्याचे दत्ता पोळ यांनी सांगितले.

कोरोनाचा संसर्ग वाढत असून त्यावर नियंत्रण करणे प्रशासनाकडून शक्य होत नाही. रुग्णांना बेड नाही, ऑक्सिजन मिळत नाही, औषधोपचार नाही, तज्ञ व कुशल डॉकटर्स, कर्मचारी वर्ग नाही, खाजगी हॉस्पिटलची लूट सुरु असल्याचा आरोपही पोळ यांनी केला.

रुग्णांना जेवणाची योग्य व्यवस्था नाही, मृत्यूचे प्रमाण प्रचंड आहे. जम्बो हॉस्पिटलमध्ये भ्रष्टाचार झाला असून संपूर्ण व्यवस्था विस्कळीत झाली आहे. यामुळे सामान्य नागरिकांचा आरोग्य यंत्रणेवरील विश्वास उडाला आहे, असेही यावेळी संघटनेतर्फे सांगण्यात आले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.