Pune News : फुरसुंगी – उरळी देवाची स्वतंत्र नगरपालिकेच्या निर्णयानंतर ‘या’ गावाने केली मोठी मागणी

एमपीसी न्यूज : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Pune News) यांनी दोन दिवसांपूर्वी पुणे महानगरपालिकेत नव्याने समाविष्ट झालेल्या फुरसुंगी आणि उरुळी देवाची या दोन गावांची स्वतंत्र नगरपालिका करण्याचा निर्णय घेतला आहे. पुणे महानगरपालिकेतून वगळण्यात आले आहे. या गावातील ग्रामस्थांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी नगरपालिका करण्याचा निर्णय घेतल्याचे एकनाथ शिंदे यांनी सांगितले होते. त्यानंतर आता मात्र पुणे जिल्ह्यातील वाघोली ग्रामस्थांकडून देखील वाघोलीला नगरपालिका करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. वाघोलीची माजी सरपंच संदीप सातव यांनी मुख्यमंत्र्यांना या संदर्भात पत्र लिहून मागणी केली आहे.

2017 मध्ये पुणे महानगरपालिकेत 11 नवीन गावांचा समावेश झाला होता. तर त्यानंतर काही महिन्यांनी वाघोलीसह 23 गावांचा देखील समावेश पुणे महानगरपालिकेत करण्यात आला. या गावांचा समावेश झाला, परंतु अद्यापही म्हणावा तसा विकास या गावात झाला नाही. मात्र, मिळकत कर या गावातून वसूल केला जातोय. याच्या विरोधात गावातील नागरिक सातत्याने उभे आहे. मात्र, त्यांच्या मागण्याकडे दुर्लक्ष केले जात आहे.

Baramati News : मेडिकल कॉलेजच्या विद्यार्थ्याला नग्न करून मारहाण करणाऱ्या तिघांना अटक

ज्या प्रमाणात महानगरपालिका कर वसूल करते. त्या प्रमाणात (Pune News) सोयी सुविधा मिळत नसल्याची खंत नव्याने समाविष्ट झालेल्या गावातील अनेक नागरिकांनी यापूर्वी बोलून दाखवली आहे. वाघोलीतील ग्रामस्थांची देखील हीच मागणी या आधीही राहिली आहे. त्यानंतर आता थेट स्वतंत्र नगरपालिका करण्यात यावी अशी मागणी वाघोली ग्रामस्थांकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे करण्यात आली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.