Pune News: पुण्यात 187 ठिकाणी गणेश मूर्तीदान केंद्रे

एमपीसी न्यूज – पुणे शहरात कोरोनाचे वाढते संकट लक्षात घेऊन गणेश मूर्ती विसर्जनाच्या वेळी गर्दी टळावी यासाठी पुणे महापालिकेने शहरातील 187 ठिकाणी गणेश मूर्तीदान केंद्रे सुरू केली आहेत.

प्रत्येक वॉर्डात तीन ते पाच ठिकाणी मूर्तीदान केंद्रांची व्यवस्था करण्यात आली आहे. या केंद्रांची माहिती संबंधित वार्डात प्रमुख चौकांमध्ये आणि सोशल मिडियावर व स्थानिक लोकप्रतिनिधींमार्फत नागरिकांपर्यंत पोहचविण्यात आली आहे.

घरच्या घरी गणेश विसर्जन करण्यासाठी, प्लॅस्टर ऑफ पॅरिसची मूर्ती विरघळण्यासाठी महापालिकेच्या वतीने पुरविण्यात येणाऱ्या अमोनियम बायोकार्बोनेटचा पुरवठा शहरातील 221 आरोग्य कोठ्यांमार्फत नागरिकांना मोफत करण्यात येणार आहे.

सध्या 50 किलोची 671 पोती अमोनियम बायकार्बोनेट उपलब्ध असल्याचे  घनकचरा विभागाचे प्रमुख ज्ञानेश्वर मोळक यांनी सांगितले. तर, काही गणेश मूर्ती विक्रेत्यांनी रसायनाअभावी प्लॅस्टर ऑफ पॅरिसची मूर्ती विकली जात नसल्याने स्वत: हे रसायन खरेदी करून ते मूर्तीसोबत मोफत दिले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.