Pune News : कात्रज जुन्या बोगद्याजवळ वाहनचालकांना लुटण्याच्या तयारीत असलेली टोळी अटकेत

एमपीसी न्यूज – कात्रज जुन्या बोगद्याजवळ वाहनचालकांना लुटण्याच्या तयारीत असलेल्या पाच जणांच्या टोळीला पोलिसांनी अटक केली आहे. भारतीय विद्यापीठ पोलिसांनी ही कारवाई केली असून आरोपी यांच्या कडून धारदार हात्यारं जप्त करण्यात आली आहेत. 

सुरेश बळीराम दयाळु (वय 29, रा. बिबवेवाडी पुणे) चाँद फकरुददीन याकुब शेख (वय 22, रा. बिबवेवाडी पुणे) कृष्णा विक्रम ढावरे (वय 22, रा. बिबवेवाडी पुणे) असीफ अल्लाबक्ष शेख (वय 21, रा. इंदीरानगर पुणे) अशिष नवनाथ डाकले (वय 25, रा. कोंढवा पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी (दि. 19) रात्री आठच्या सुमारास अटक आरोपी जुन्या कात्रज बोगद्याजवळ वाहनचालकांना लुटण्याच्या तयारीत आहेत अशी माहिती भारतीय विद्यापीठ पोलिसांनी मिळाली. त्यानुसार पोलिसांनी दोन टिम तयार करून सापळा रचून पाच जणांना धारदार हात्यारं जप्त करण्यात आली. अटक आरोपी यांच्यावर चोरी, दरोडा, खुनाचा प्रयत्न असे गंभीर गुन्हे नोंद आहेत. पोलीस अधिक तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.