Pune News: पुण्यात रास्ता पेठेत दोघांकडून साडेसहा लाख रुपयांचा गांजा जप्त

एमपीसी न्यूज – पुणे पोलीस गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथक 02 ने रास्ता पेठ (Pune News) येथे गांजा विक्री करण्यासाठी आलेल्या दोन पुरुषांकडून 6,50,020 रुपये किंमतीचा 32 किलो 501 ग्रॅम गांजा जप्त केला.

याप्रकरणी अक्षय रोकडे (वय 21 वर्षे, रा. मु. पो. सालसे, ता. करमाळा, जि. सोलापूर) आणि करण तथा धम्मदीप सुरवसे (वय 19 वर्षे, रा. मु. पो. पारगाव, खंडाळा, सातारा) या दोन आरोपींना अटक करण्यात आले आहे.

पोलीस आयुक्त पुणे शहर रितेश कुमार यांनी पुणे शहराच्या (Pune News) पोलीस आयुक्त म्हणून पदभार स्वीकारल्यापासून पुणे शहरातील अंमली पदार्थ विक्रीचे रॅकेट चालविणाऱ्या गुन्हेगारांवर कठोर कारवाई करून त्यांच्यावर कारवाई करण्याबाबत आदेश दिले आहेत.

त्याप्रमाणे 12 जानेवारी 2023 रोजी अमली पदार्थ विरोधी पथक दोन गुन्हे शाखेकडील पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार समर्थ पोलीस ठाण्याच्या हद्दीत पेट्रोलिंग करत असताना पोलीस कर्मचारी योगेश मांढरे यांना रास्ता पेठ येथे दोन इसम गांजा विक्री करण्यासाठी येणार असल्याची बातमी मिळाली.

Hadapsar Crime news : संघटित गुन्हेगारी करून दहशत निर्माण करणाऱ्या कथित कोयता गॅंगच्या 14 जणांच्या टोळीवर मोक्का अंतर्गत कारवाई

या बातमीवरून अंमली पदार्थ विरोधी पथक दोनकडील अधिकारी व कर्मचारी यांनी वरील परिसरात सापळा लावला. त्यावेळेस रस्ता पेठ येथील द क्रश लॉज (Pune News) समोर सार्वजनिक रोडवर अक्षय रोकडे व करण सुरवसे या दोन आरोपींकडून एकूण 6,81,250 रुपये किंमतीचा ऐवज त्यामध्ये 6,50,020 रुपये किंमतीचा 32 किलो 501 ग्रॅम गांजा आणि वीस हजार रुपये किंमतीचे दोन मोबाईल फोन, 1,000 रुपये किमतीची लाल सुटकेस, पाचशे रुपये किमतीची एक हिरवट रंगाची सॅक व 10,000 रुपये रोख रक्कम असा ऐवज जप्त करण्यात आला.

आरोपीचे विरुद्ध समर्थ पोलीस ठाण्यामध्ये एन डी पी एस ऍक्ट 8 (क), 20(ब)(ii) (k), 29 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक दिगंबर चव्हाण पुढील तपास करीत आहेत

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.