Pune News : गावठी कट्टा बाळगणा-या गुन्हेगारास अटक 

एमपीसी न्यूज – गावठी कट्टा व एक जिवंत काडतुस जवळ बाळगणा-या एकाला खंडणी व अंमली विरोधी पथकाने अटक केली आहे. बुधवारी (दि.21) हि कारवाई करण्यात आली. त्याच्याकडुन एक गावठी कट्टा व एक जिवंत काडतुस जप्त करण्यात आले आहे. 

सतिश शांतीलाल कोळी ( वय 24, रा.धायरी, मुळगाव मु.पो.विखरण, ता.जि.नंदुरबार ) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हा धायरी येथील जिजाऊनगर या ठिकाणी एक गावठी कट्टा घेऊन थांबला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी आरोपीला या ठिकाणाहून ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता त्याच्याजवळ 40,100 किंमतीचा एक गावठी कट्टा व एक जिवंत काडतुस सापडले. पोलीस अधिक तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.