-MPC-TOP-MOST-BANNER-I

Pune News : पोटगीचा आदेश मिळवून द्या ; 1,11,111 रुपये मिळवा – अतुल छाजेड

-MPC-FIRST-TOP-BANNER-I

एमपीसी न्यूज – महिलेला पोटगीचा आदेश मिळवून द्या आणि 1 लाख 11 हजार 111 रुपयांचे बक्षीस जिंका असे आवाहन पोटगी बंद आंदोलनाचे प्रणेते अतुल छाजेड यांनी केले आहे. पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत अतुल छाजेड बोलत होते.

अतुल छाजेड म्हणाले, शिवाजीनगर येथील कौटुंबिक न्यायालयात एक केस दाखल आहे. या केस मध्ये महिलेच्या पतीने कोर्टाला पोटगीचा आदेश काढण्याची विनंती केली आहे. तरी न्यायालय पोटगीचा आदेश काढत नाही. या महिलेला पोटगीचा आदेश मिळवून द्या आणि 1 लाख 11 हजार 111 रूपयांचे बक्षीस जिंका असे आवाहन पोटगी बंद आंदोलनाचे प्रणेते अतुल छाजेड यांनी केले आहे.

-MPC-SECOND-TOP-BANNER-I

अतुल छाजेड पुढे म्हणाले, हिंदू विवाह कायदा महिलांना न्याय देण्याची हमी देत नाही. या कायद्याचा 90 टक्के महिला गैरवापर करतात तर, 10 टक्के पुरूष देखील गैरवापर करतात. फक्त महिलांसाठी हा कायदा बनवला गेल्याने पुरूषांना न्याय मिळत नाही. कायद्याच्या अन्यायामुळे 40 टक्के पुरूष आत्महत्या करीत असल्याचे छाजेड म्हणाले.

पुरुषांना न्याय मिळण्यासाठी पुरुष हक्क आयोग स्थापन व्हावा तसेच, ज्या महिला पुरुषांवर खोटे आरोप करतील त्यांना कायद्याने शिक्षा मिळावी, अशी मागणी यावेळी अतुल छाजेड यांनी केली.

-MPC-BOTTOM-BANNER-I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

.