Pune News – ‘कामायनी’तील मुलांना गुढीपाडव्यानिमित्त नव्या कोऱ्या सलवार-कुर्त्याची भेट

एमपीसी न्यूज – गुढीपाडव्यानिमित्त  22 मार्च रोजी कामायनी (Pune News) संस्थेतील विशेष मुलांना सलवार-कुर्ता वाटप करण्यात आला. अंगावर नवा कोरा सलवार-कुर्ता, स्वादिष्ट खाऊ आणि आवारात गुढीचे पूजन करत कामायनी संस्थेतील विशेष मुलांनी नव्या वर्षाचा आनंद साजरा केला.

युवा सामाजिक कार्यकर्ते ऋषिकेश कोंढाळकर व अनिकेत कोंढाळकर यांच्या पुढाकारातून वेस्ट झोन वस्त्र दालनाच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. गोखलेनगर येथील कामायनी संस्थेच्या मुनोत सभागृहात 300 मुलांना सलवार-कुर्ता देऊन गुढीपाडवा साजरा करण्यात आला.

Pimpri News : राज्यातील सत्ताधार्‍यांच्या दबावाखाली महापालिका प्रशासकांचा कारभार – अजित गव्हाणे

प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीच्या सहकार्यवाह, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अधिसभा सदस्य व विद्या परिषद सदस्य, माजी नगरसेविका प्रा. डॉ. ज्योत्स्ना एकबोटे यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम झाला. यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विद्यापीठ भागाचे सह संघचालक सुभाष कदम, मुकुल माधव फाउंडेशनचे समन्वयक (Pune News) सचिन कुलकर्णी, आम्ही पुणेकर संस्थेचे अध्यक्ष हेमंत जाधव, व्हिजन सोशल फाउंडेशनचे अध्यक्ष विकास डाबी, सेवा निवृत्त अधिकारी लक्ष्मण गरुड, मित्र फाउंडेशनचे भूषण सोनावणे, उद्योजक सुनील डोडेजा, भाजप युवा मोर्चा शिवाजीनगरचे सरचिटणीस कल्पेश मोरे, युथ फाउंडेशनचे सौरव राजमाने, आशिष राऊत आदी उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.