Pune News : आईला खाली वाकून पाहत असताना तिसऱ्या मजल्यावरून पडल्याने चिमुरडीचा मृत्यू

एमपीसी न्यूज – खाली थांबलेल्या आईला इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरील गॅलरीतून वाकून पाहत असताना तोल जाऊन खाली पडल्याने तीन वर्षाच्या चिमुरडीचा मृत्यू झाला आहे. पुण्याच्या महात्मा सोसायटीतील वृन्दावन पार्क सोसायटीत ही घटना घडली.

अविष्का विशाल कोळपकर (वय 3) असे मृत्युमुखी पडलेल्या चिमुरडीचे नाव आहे. कोथरुड पोलीस ठाण्यात या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, रविवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास अविष्काची आई भाजी आणण्यासाठी खाली आल्या होत्या. यावेळी अविष्का घरात एकटीच होती. थोड्या वेळानंतर अविष्का आई आली का हे पाहण्यासाठी गॅलरीत गेली. आणि ती गॅलरीतून खाली वाकून पाहत होती. खाली वाकून पाहत असताना अचानक तिचा तोल गेला आणि तिसऱ्या मजल्यावरून ती खाली पडली.

यामध्ये गंभीर जखमी झाल्याने तिला जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाला होता. अविष्का तिच्या आई-वडिलांना एकुलती एक होती. तिचा असा मृत्यू झाल्याने कोळपकर कुटुंबीयांना मोठा धक्का बसला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.