Pune News : जन्म आणि मृत दाखले त्वरित द्या : राष्ट्रवादी युवक काँग्रेसची मागणी

एमपीसी न्यूज – पुणे महापालिका क्षेत्रात जन्म आणि मृत दाखले त्वरित देण्यात यावे, अशी मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसतर्फे महापालिकेच्या सहाय्यक आयुक्त तथा आरोग्य अधिकारी डॉ. कल्पना बळीवंत यांच्याकडे गुरुवारी (दि. 24 सप्टेंबर) करण्यात आली आहे.

याबाबत राष्ट्रवादीचे गिरीश गुरनानी यांनी डॉ. बळिवंत यांना निवेदन दिले आहे. पुणे महापालिकेतर्फे यापूर्वी जन्मास आलेल्या नवोदित बालके आणि मृत्यूमुखी पडलेल्या व्यक्तींची नोंद त्यांच्या जन्मास आणि मृत्यूनंतर 21 दिवसांच्या आत होत असे.

परंतु, गेल्या काही दिवसांपासून ही यंत्रणा ठप्प झाली आहे. नागरिकांना त्यामुळे अनेक शासकीय योजना, वैद्यकीय सहाय्य, शैक्षणिक प्रवेश याबाबत अडचणी येत आहेत. ही योजना पूर्ववत सुरू करण्यात यावी.

_MPC_DIR_MPU_II

तसेच कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर जे कर्मचारी काम करीत होते. त्यांचे कॉन्ट्रॅक्ट संपलेले आहे. ते पुढे कार्यरत झालेले नाही. त्यामुळे नागरिकांचे बरेचसे हाल होत असल्याचे राष्ट्रवादी युवक काँग्रेसतर्फे गुरनानी यांनी म्हटले आहे.

दरम्यान, यासंदर्भात जन्म – मृत्यू विभागाच्या प्रमुख डॉ. कल्पना बळीवंत यांच्याशी संपर्क साधला असता त्या म्हणाल्या, या खात्यात कर्मचारी कामाला आहेत. एका टेंडरची निविदा प्रक्रिया सुरू आहे. तीन आठवड्यापासून कॉन्ट्रॅक्टचे कर्मचारी कामे करीत आहेत. लॉकडाऊनच्या काळातील महिन्याचे अडीच ते तीन हजार मृत्यू आणि तेवढेच जन्म दाखले आहेत. तो बॅकलॉग राहिला आहे.

तरीही मृत्यूची नोंदणी सुरू ठेवली आहे. जुलै आणि ऑगस्टचे दाखले देण्यात येत आहेत. मृत्यूच्या दाखल्यांना प्राधान्य दिले आहे. सध्या सात डेटा एन्ट्री ऑपरेटर काम करीत आहेत. शिवाय कर्मचारी सुद्धा काम करीत आहेत. अडीच ते तीन हजार महिन्याचा एव्हरेज भरून काढत आहे. नागरिक, बँक आणि विमा कंपन्यांनीही समजून घेतले पाहिजे.

डेटा एन्ट्री ऑपरेटर टेंडर पुढील मंगळवार पर्यंत फायनल होणार आहे. त्यामुळे आणखी मुले कामासाठी येणार आहेत. अतिरिक्त आयुक्तांनी आणखी सात कर्मचाऱ्यांची व्यवस्था केली आहे. नागरी सुविधा केंद्राच्या ठिकाणी नागरिकांना प्रिंट आउट मिळते. त्यामुळे 50 टक्के दाखले मिळतील. मात्र, त्यांना थेट कसब्यातच पाठविले जाते. त्यामुळे मोठ्या प्रमाणात गर्दी वाढत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.