Pune News: फिल्डवर वार्तांकन करणाऱ्या पत्रकारांना ‘विमा सुरक्षा’ द्या- गोपाळ तिवारी

दिवंगत पत्रकार पांडुरंग रायकर यांचे ‘कोरोना’ संसर्गमुळे मृत्यू’ ही घटना मनाला चटका लावून जाणारी आहे.

एमपीसी न्यूज – कोरोनाच्या संसर्ग काळात फिल्डवर वार्तांकन करणाऱ्या पत्रकारांना किमान वर्षभराचे तरी ‘विमा सुरक्षा’ कवच द्यावे, अशी मागणी काँग्रेसचे प्रवक्ते गोपाळ तिवारी यांनी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडे केली आहे.

राज्यस्तरीय संघटनेतर्फे तसा प्रस्ताव दिला तर पत्रकार बांधवांच्या कुटुंबीयांकरिता ‘विमा सुरक्षा’ देण्याबाबत सकारात्मक प्रतिसाद मिळू शकेल, हा विश्वास असल्यामुळेच तशी मागणीचे निवेदन दिलेले आहे.

टीव्ही 9 वृत्तवाहिनीसाठी वार्तांकन करणारे दिवंगत पत्रकार पांडुरंग रायकर यांचे ‘कोरोना’ संसर्गमुळे मृत्यू’ ही घटना मनाला चटका लावून जाणारी आहे. पत्रकारितेतील मित्रानो” ‘कोरोनाच्या अनुषंगाने’ कोणतीही व केव्हाही मदत, सहकार्य लागले तर कधीही फोन करा, शक्य ती मदत करण्याचा निश्चित प्रयत्न केला जाईल. पण, बिकटप्रसंगी संपर्क अवश्य साधा. कोणतीही रिस्क घेऊ नका. महसूल मंत्री व काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्या समवेत चर्चा झाली आहे, असेही तिवारी यांनी म्हटले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.