Pune Crime News : US डॉलरचे आमिष दाखवून दिले वर्तमानपत्राचे कागद, जेष्ठ नागरिकांची एक लाखांची फसवणूक

एमपीसी न्यूज – US डॉलरचे आमिष दाखवून वर्तमानपत्राचे कागद देत जेष्ठ नागरिकाची 99 हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. सोमवारी (दि.12) सिंहगड रोड परिसरात हा प्रकार उघडकीस आला.

याप्रकरणी 60 वर्षीय जेष्ठ नागरिकांने दत्तवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार एक महिला व अज्ञात इसमाविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

_MPC_DIR_MPU_II

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन अज्ञात आरोपींनी फिर्यादी इसमला US डॉलर देण्याचे आमिष दाखवले. त्यानुसार आरोपींनी फिर्यादी यांना निलायम ब्रिज, सिंहगड रोड याठिकाणी बोलवले. फिर्यादी यांच्या कडून 99 हजार रुपये असलेली बॅग घेतली.

त्यानंतर US डॉलर असल्याचे भासवून त्यांना वर्तमानपत्राचे कागद असलेली बॅग देऊन फसवणूक केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.