Pune News : देशी वृक्ष लागवडीला प्राधान्य द्या; अजित पवार यांचा सल्ला

एमपीसी न्यूज – विदेशी वृक्ष देशी वृक्षांना जगू देत नाही. बाहेरच्या झाडांवर पक्षी येत नाही. काही झाडे तोडुन त्या ठिकाणी देशी झाडे लावावीत. ते लावत असताना त्यांची देखरेख ठेवावी. वड, लिंब, चिंच ही मूळ झाले हवामानाशी एकनिष्ठ झाले. त्यामुळे अशा वृक्ष लागवडीला प्राधान्य द्यावे, असा सल्ला उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री अजित पवार यांनी दिला.

वनविभागाच्या 35 एकर जागेत भव्य संजीवन उद्यान भूमिपूजन समारंभ अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आयुक्त विक्रम कुमार, अतिरिक्त आयुक्त खेमणार, शहराध्यक्ष प्रसन्न जगताप, वन राज्यमंत्री दत्तामामा भरणे, नगरसेवक दिलीप बराटे, बाबुराव चांदेरे, सचिन दोडके, नगरसेविका लक्ष्मी दुधाने, शिक्षण मंडळाचे माजी अध्यक्ष बाबा धुमाळ, सामाजिक कार्यकर्ते स्वप्नील दुधाने उपस्थित होते.

अजित पवार म्हणाले, वर्षानुवर्षं येथे डुकरांचा मोठ्या प्रमाणात वावर होता. या उद्यानामुळे आता वारजे – माळवाडी, कोथरूड परिसरातील नागरिकांना मोकळा श्वास घेता येईल. पुणेकर नाव ठेवण्यात पटाईत आहेत. त्यातल्या त्यात पाट्या जगप्रसिद्ध आहेत. तर, विविध प्रकल्प आढावा दर 15 दिवसाला होतात. राज्य आणि केंद्र शासनाच्या प्रकल्प आढावा घेत असतो. दर आठवड्याला पुणे, ग्रामीण, पिंपरीला देत असतो, अशा शब्दांत विरोधकांना सुनावले. पिंपरीची मेट्रो वाघोली पर्यंत नेण्याचा मनोदय व्यक्त केला.

विरोधी पक्षनेत्या दीपाली धुमाळ म्हणाल्या, 1997 साली वारजे मनपात समाविष्ट झाले. सध्या 4 ही नगरसेवक चांगले काम करीत आहेत. वनोद्यान विकसित करतांना प्रशासन आणि अजित पवार यांचे चांगले सहकार्य लाभले.

धर्मराज हांडे महाराज यांनी सूत्रसंचालन केले. अनघा राजवाडे यांनी पसायदान म्हटले. बाबा धुमाळ यांनी आभार मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.