Pune News : आजारपणाची लक्षणे असल्यास खरी माहिती द्या : आमदार तुपे

0

एमपीसी न्यूज – हडपसर मतदारसंघातील सर्वच नागरिकांनी आजारपणाची लक्षणे असल्यास खरी माहिती द्यावी, असे आवाहन आमदार चेतन तुपे यांनी केले आहे.

कोविड 19 मुळे उदभवलेल्या परिस्थितीला तोंड देण्यासाठी “माझे कुटुंब, माझी जबाबदारी” हे कल्पक अभियान महाविकासआघाडी सरकार राज्यभर राबविले जात आहे. हडपसर विधानसभा मतदारसंघात आज, मंगळवारी (दि. 15 सप्टेंबर) माळवाडी येथील धर्मवीर संभाजीराजे प्रतिष्ठान चौकात अतिरिक्त आयुक्त कुणाल खेमणार आणि आमदार तुपे यांच्या उपस्थितीत या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली.

या उपक्रमा अंतर्गत स्वयंसेवक घरोघरी ताप आणि प्राणवायू तपासणी करणार आहेत. यामुळे कोरोना रुग्ण तात्काळ सापडणार असून त्यांच्यावर वेळेत उपचार करणे शक्य होणार आहे, असेही चेतन तुपे यांनी सांगितले.

यावेळी नगरसेवक मारुती तुपे, योगेश ससाणे, नगरसेविका पुजा कोद्रे,   वैशाली बनकर, स्विकृत नगरसेवक अविनाश काळे, मनोज घुले, संजीवनी जाधव, दत्तात्रय तुपे, गणेश ससाणे, विजय तुपे उपस्थित होते.

पुणे शहरात कोरोनाचे संकट गंभीर झाले आहे. त्यामुळे नागरिकांनी अधिक काळजी घेण्याची गरज आहे. राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विविध उपाययोजना करण्यात येत आहे. पुणेकरांना या संकटातून बाहेर काढण्यासाठी पुढाकार घेण्यात येत असल्याचेही चेतन तुपे म्हणाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.