Pune News : पुण्यात होणार ‘गुगल’चे कार्यालय ; कर्मचारी भरती सुरू

एमपीसी न्यूज – ‘गुगल’ने पुण्यात कार्यालय सुरू करण्याची घोषणा केली आहे. लवकरच सुरू होणाऱ्या या कार्यालयासाठी कर्मचारी भरती सुरू झाली आहे. भारतातील क्लाउड इंजिनीअरिंगचे VP अनिल भन्साळी यांनी याबाबत घोषणा केली आहे.

पुण्यातील कार्यालयात प्रगत एंटरप्राइझ क्लाउड तंत्रज्ञान तयार करण्यासाठी व्यावसायिकांना नियुक्त करेल. या वर्षाच्या दुसऱ्या सहामाहीत हे कार्यालय सुरू होण्याची शक्यता आहे, ही सुविधा क्लाउड प्रोडक्शन इंजिनिअरिंग, टेक्निकल असिस्टंस आणि जागतिक वितरण केंद्र संस्थांसाठी लोकांना नियुक्त करणार आहे. यामुळे ज्या प्रोफेशन्सलनी क्लाउड किंवा यासंबंधीचं शिक्षण घेतलं आहे त्यांना या नवीन ऑफिसमध्ये जॉब मिळण्याची शक्यता अधिक आहे.

सध्या देशात गुडगाव, हैद्राबाद आणि बंगलोर या प्रमुख शहरांमध्ये मोठ्या प्रमाणावर कर्मचाऱ्यांची भरती सुरु आहे. त्यापाठोपाठ आता पुण्यातील ऑफिस सुरु झाल्यानंतर इथेसुद्धा फ्रेशर्स आणि प्रोफेशन्सलची भरती केली जाणार आहे.

‘आयटी हब म्हणून पुण्यातील आमचा विस्तार आम्हाला उच्च प्रतिभेचा वापर करण्यास सक्षम करेल, वाढत्या ग्राहकांसाठी प्रगत क्लाउड कॉम्प्युटिंग सोल्यूशन्स, उत्पादने आणि सेवा आम्ही विकसित करत आहोत,’ अनिल भन्साळी यांनी म्हंटलं आहे. पुण्याच्या कार्यालयात उपलब्ध असलेल्या जागा पाहण्यासाठी Google Careers या लिंकवर जाऊन माहिती पाहता येईल.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.