Pune News : फुरसुंगी येथे आगीत किराणा मालाचे दुकान जळून खाक, सुदैवाने जिवीत हानी नाही

एमपीसी न्यूज – फुरसुंगी येथील (Pune News) हरपळे वस्ती, तारांगणा सोसायटी (Pune News) येथे रामदेव सुपर मार्केट या किराणा मालाच्या दुकानाला आज (बुधवारी) पहाटे पावणे पाचच्या सुमारास भीषण आग लागली. ज्यामध्ये हे दुकान पुर्णपणे जळून खाक झाले आहे.

या घटनेची वर्दी मिळताच पहाटे अग्निशमन दलाकडून हडपसर व काळेबोराटे नगर अग्निशमन केंद्र येथून 2 फायर गाड्या रवाना करण्यात आल्या होत्या.

घटनास्थळी पोहोचताच अग्निशमनदलाच्या जवांनानी होज पाईपच्या साहाय्याने आगीवर पाण्याचा मारा करत आग विझवली. दुकानात कोणी अडकले नसल्याची खात्री करून 20 मिनिटात आगीवर नियंत्रण मिळवून पुढील काही वेळातच आग इतरञ पसरु न देता पुर्ण विझवली. तसेच, जवानांनी पुढील धोका टाळला. किराणा मालाचे दुकान बंद असल्याने आतमधे कोणी नसल्याने जखमी वा जिवितहानी झाली नाही. ही आग इलेक्ट्रिक शॉर्टसर्किटमुळे लागल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. या आगीमधे संपूर्ण किराणा माल तसेच फर्निचर व फ्रिज जळाले आहे.

Pune : वीज कंत्राटी कामगारांना त्रास देणाऱ्या कंत्राटदारावर पुण्यात खटला दाखल

ही कामगिरी हडपसर अग्निशमन केंद्र (Pune News) अधिकारी प्रमोद सोनावणे व वाहनचालक नारायण जगताप, अमित सरोदे व जवान दत्तात्रय चौधरी, महेंद्र कुलाळ, चंद्रकांत नवले, सुरज यादव, नितेश डगळे यांनी केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.